Wednesday, July 17, 2024
Wednesday, July 17, 2024

HomeFact Checkहवेत तरंगणारी रेल्वेगाडी चीनमध्ये सुरू झालेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

हवेत तरंगणारी रेल्वेगाडी चीनमध्ये सुरू झालेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

हवेत तरंगणारी रेल्वेगाडी चीनमध्ये सुरू झाली असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चार मिनिटे 32 सेंकंदांच्या या व्हिडिओत अनेक रेल्वेगाड्या हवेतून येउन रेल्वे रुळावर उतरुन पुढे धावताना दिसत आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हवेत तरंगत मार्गक्रमण करणारी रेल्वेगाडी चीनमधे सुरू झाली आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती वेगवान तर आहेच ; परंतु तिला चाके नाहीत ! ती उच्चतम तापमानाच्या ‘अतिउत्कृष्ट वहनक्षमता’ या तंत्रज्ञानाच्या आधारावर चालते. केवळ अविश्वसनीय !!! हे आश्चर्य प्रत्यक्ष‌च पाहा.”

आमच्या एका वाचकाने हा व्हिडिओ पडताळणीसाठी आमच्याकडे पाठवला होता. अधिक शोध घेतला असता हा दावा सोशल मीडियात विशेषकरुन फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

वाचकाने पडताळणीसाठी पाठविलेली पोस्ट (संग्रहित)

Fact Check / Verification

आम्ही चीनमध्ये खरंच तरंगणारी रेल्वेगाडी सुरु झाली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. Floating Train in China या किवर्डसने शोध सुरु केला असा युट्यूबवर व्हायरल व्हिडिओशी मिळतेजुळेत दृश्य अशणारा एका व्हिडिओ आढळून आला. 14 नोव्हेंबर 2020 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. मात्र यात चीनचा उल्लेेख नाही .

अधिक शोध घेतला असता आम्हाला युट्यूबवर आणखी एक व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ आॅगस्ट 2020 रोजी अपलोड करण्यात आला आहे. याच्या डिस्क्रिप्शनमध्ये Trainz Railroad Simulator 2019 असे लिहिलेले आहे. यावरुन लक्षात येते की हा व्हिडिओ खरा नसून ती व्हिडिओ गेम आहे.

याबद्दल अधिक तपशील मिळवण्यासाठी पुढे शोध सुरुच ठेवला असता हा व्हिडिओ इंडोनेशियातून अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. याशिवाय आम्हाला फेसबुकवर TrainzSimulator नावाचे पेज देखील आढळून आले. यावर रेल्वेगाड्यांचे अॅनिमेटेड व्हिडिओज आहेत. यावरुन स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ चीनच्या तरंगत्या ट्रेनचा नसून अॅनिमेटेड व्हिडिओ आहे.

चीनच्या तरंगत्या रेल्वेविषयी आम्हाला माहिती मिळाली

चीनच्या सिन्हुआ न्यूजनेही मॅगलेव्ह ट्रेन प्रोटोटाइपचे व्हिज्युअल ट्विट केले होते ज्यात उच्च-तापमानात सुपरकंडक्टिंग मॅग्लेव्ह तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

Independent मधील लेखात नमूद केले आहे की ट्रेनला चाके नाहीत आणि मॅग्नेट वापरते ज्यामुळे “त्यास ट्रॅकच्या अगदी वर फिरता येते, परिणामी घर्षणविरहित, वेगवान प्रवास होतो.”

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ चीनमधील तरंगणा-या रेल्वेगाडीचा नसून एका व्हिडिओ गेमधील दृश्य आहे.

Result – Fasle

Our Sources

XHNews- https://twitter.com/XHNews/status/1350404427358765057

Independant- https://www.independent.co.uk/travel/news-and-advice/china-levitating-train-travel-b1787801.html

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular