ओवेसी आणि शहा यांच्यात सिक्रेट डील झाल्याचा दावा करणारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ बिहार निवडणुकी दरम्यान व्हायरल झाला आहे. बिहार निवडणुकीत एआयएमआयएमचे नेते ओवेसी आणि भाजप नेते अमित शहा यांची सिक्रेट डील झाली होती असा दावा करणारे पत्र आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल वाचून दाखवत असल्याचे यात दिसत आहे.

Fact Check/Verification
बिहार निवडणुकीत एमआयएमचे नेते ओवेशी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात गुप्त डिल झाली असल्याचा दावा करणा-या केजरीवाल यांच्या व्हिडिओ सत्य नेमके काय आहे याची पडताळणी करण्याचे आम्ही ठरविले. यासंदर्भात माध्यमांत काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का याचा शोध घेतला असता केजरीवाल यांची अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओतील की काही कीफ्रेम्सचा रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता युट्यूबवर 18 जुलै 2016 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळून आला.
हा व्हिडिओ विशाल ददलानी यांच्या शोचा असून त्यात अरविंद केजरीवाल यांनी अमित शहाचे निकटवर्तीय मानले जाणारे यतीन ओझा यांचे पत्र वाचले होते. यात त्यांनी दावा केला होता की, अमित शहा यांच्या निवासस्थानी 15 सप्टेंबर 20115 रोजी पहाटे शहा आणि अकबरुद्दीन ओवेशी यांच्यात गुप्त बैठक झाली होती.
या व्हिडीओविषयी अधिक माहिती शोधली असता हा व्हिडिओ 2015 मधील बिहार निवडणुकी दरम्यान प्रसिद्ध झाला होता. मात्र यातील दावे निराधार असल्याचे सांगत अकबरुद्दीन ओवेसी यांनी केजरीवाल यांनी केलेेले आरोप फेटाळून लावले तसेच केजरीवाल यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करू असेही सांगितले होते, परंतु केजरीवाल यांनी ओझांच्या पत्राचा आधार घेत ही माहिती दिल्याने थेट त्यांच्याविरोधात कारवाई होणे शक्य झाले नाही. केजरीवाल यांचा व्हिडिओ व्हायरल होण्याआधी यतीन ओझा यांनी केलेल्या या आरोपा संदर्भात बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या होत्या.

Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, केजरीवाल यांचा व्हायरल व्हिडिओ बिहार निवडणूक 2020 संदर्भातील नसून 2015 साली बिहार निवडणुकीसंदर्भात 2016 साली केलेल्या दाव्याचा आहे.
Result-Misleading
Our Sources
Delhi Government– https://www.youtube.com/watch?v=mWxYRLsqI5s
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.