भारतीय वंशाच्या अहमद खान यांची जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडन यांच्यासोबत एका व्यक्तीचा फोटो शेअर करण्यात येतोय. दावा केला जातोय की ही व्यक्ती भारतीय वंशाचे अहमद खान असून, त्यांची जो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Fact Check/Verification
अहमद खान नामक व्यक्तीची अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या राजकीय सल्लगारपदी नियुक्ती करण्यात आली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये या संदर्भात बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही रिव्हर्स इमेजच्या मदतीने जो बायडन आणि त्यांच्या पत्नी समवेत फोटोत असणारी व्यक्ती नेमकी कोण आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली. आम्हाला अहमद खान यांच्या फेसबुक अकाऊंटवरून 11 डिसेंबर 2015 रोजी अपलोड हाच फोटो अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. जो बायडन अमेरिकेचे उप-राष्ट्रपती असताना हा फोटो घेण्यात आला आहे.
याशिवाय बुमलाइव्ह या फॅक्ट चेकिंग वेबसाईटला प्रतिक्रिया देताना अहमद खान यांनी सांगितले की, “व्हायरल ट्विटमधील दावे खोटे आहेत. सध्या मला राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त केलेेले नाही. काही अतिउत्कासाही लोकांनी जुना फोटो गैरसमजुतीतून शेअर केला आहे. माझ्यासोबत देखील काही लोकांनी हा फोटो शेअर केल्यानंतर मला याबाबत माहिती मिळाली. मी यावर तो फोटो जुना असल्याचे स्पष्टिकरण देखील दिले आहे.
अहमद खान यांनी ‘ड्राफ्ट बायडन 2016’ मोहिमेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिलेले आहे. 2016 सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बायडन यांच्या नावासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती आणि पाठिंबा यांची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने हे अभियान चालविण्यात आले होते. मात्र बायडन यांनी ही निवडणूक लढवली नाही. परंतु ‘ड्राफ्ट बायडन 2016’च्या टीमने केलेल्या उत्तम कामाच्या सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमातील हा फोटो आहे. जो सध्याचा म्हणून व्हायरल होत आहे.
Conclusion
यावरुन सिद्ध होते की, अहमदखान यांचा जो बायडन सोबतचा पाच वर्षापूर्वीचा फोटो आत्ताचा म्हणून शेअर केला जात आहे शिवाय खान यांची बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झालेली नाही. सोशल मीडियात खोटा दावा व्हायरल झाला आहे.
Result-Misleading
Our Sources
Twitter- https://twitter.com/ShabinaBano_/status/1326175347457421312
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.