Saturday, December 20, 2025

Crime

Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटलेली थप्पडेची खूण असल्याचे सांगत व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य जाणून घ्या

Written By Shaminder Singh, Translated By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Jun 7, 2024
banner_image

Claim
कंगना राणावतच्या गालावर उमटलेल्या थप्पडेच्या खुणेचा फोटो.
Fact

हा दावा खोटा आहे. व्हायरल झालेला फोटो कंगना राणावतचा नाही.

हिमाचल प्रदेशमधील मंडीमधून नुकतीच खासदार म्हणून निवडून आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला चंदीगड विमानतळावर CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी थप्पड मारली. पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील मंड महिवाल या गावातील रहिवासी कुलविंदर कौर यांना या घटनेनंतर निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेनंतर कॉन्स्टेबल कुलविंदर कौरचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये कंगना राणावतने तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या पंजाबमधील महिलांबद्दल पैशासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते असे चुकीचे विधान केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. कुलविंदरने सांगितले की, तिची आईही आंदोलनकर्त्यांमध्ये होती.

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही लोक कंगना राणावतच्या बाजूने तर काही लोक कुलविंदर कौरच्या बाजूने वक्तव्य करत आहेत.

दरम्यान, एका गालावर थप्पड मारल्याची खूण असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करताना दावा केला जात आहे की, हा फोटो अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतचा आहे. अशी X पोस्ट आणि संग्रहण येथे पाहता येईल.

Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटलेली थप्पडेची खूण असल्याचे सांगत व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य जाणून घ्या
Courtesy: X@Am_here_DURGA

“दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांबद्दल कंगनाने अपशब्द काढले होते. तो राग मनात ठेवून असलेल्या एका शेतकरी महिलेची मुलगी, जी चंदिगढ विमानतळावर CISF म्हणून तैनात होती, तिने कंगनाच्या कानाखाली जाळ काढला. मातीत राबलेले सैनिकी हात गालावर असा छाप सोडून जातात.” असे दाव्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलेले आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल चित्राची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Google रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने ते शोधले. शोध दरम्यान, आम्हाला ‘Neverholdyourtongue’ नावाच्या वेबसाइटवर 12 जुलै 2015 रोजी प्रकाशित झालेल्या लेखात अपलोड केलेले मूळ आणि संपूर्ण छायाचित्र सापडले. तथापि, या फोटोशी संबंधित कोणतीही माहिती लेखात शेअर केलेली नाही.

Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटलेली थप्पडेची खूण असल्याचे सांगत व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य जाणून घ्या
neverholdyourtongue

हे चित्र 2006 मध्ये Coolmarketingthinks या वेबसाइटने देखील शेअर केले होते. आम्हाला आढळले की व्हायरल होत असलेले चित्र आणि या चित्रात बरेच साम्य आहे, जे खाली पाहिले जाऊ शकते.

Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटलेली थप्पडेची खूण असल्याचे सांगत व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य जाणून घ्या
Coolmarketingthinks

हा फोटो एका रशियन वेबसाइटनेही शेअर केला होता, पण त्या लेखात फोटोशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

हे सुद्धा वाचा: Fact Check: धुळ्यात ४००० मतांनी पडलेला काँग्रेस उमेदवार फेरमोजणीनंतर ८००० मतांनी जिंकला आणि १२००० मतांचा घोळ झाला? जाणून घ्या सत्य काय आहे

Conclusion

आमच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. व्हायरल होत असलेला फोटो अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतचा नाही.

Result: False

Sources
Image uploaded on coolmarketingthoughts, Dated 31 May 2006
Image uploaded on neverholdyourtongue, Dated 12 July 2015
Self Analysis


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
ifcn
fcp
fcn
fl
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

20,641

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage