Wednesday, July 24, 2024
Wednesday, July 24, 2024

HomeFact Checkअरविंद केजरीवाल यांचा धनुष्य-बाण उलटा धरलेला हा फोटो बनावट आहे

अरविंद केजरीवाल यांचा धनुष्य-बाण उलटा धरलेला हा फोटो बनावट आहे

Claim

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून,त्याद्वारे त्यांची खिल्ली उडवली जात आहे.चित्र दसरा कार्यक्रमासारखे दिसते,ज्यात केजरीवाल धनुष्यबाण उलटे धरलेले दिसत आहेत.केजरीवाल यांना धनुष्यबाण नीट कसा धरायचा हे देखील कळत नाही असा टोला मारत लोक लिहित आहेत.हा फोटो ट्विटर आणि फेसबुकवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Fact Check

अरविंद केजरीवाल यांचा व्हायरल झालेला हा फोटो खोटा आहे.फोटोचा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर सत्य समोर येते.द इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीत,एक वास्तविक चित्र आहे,ज्यामध्ये केजरीवाल धनुष्य-बाण हातात धरलेले दिसत आहेत.मूळ फोटो ५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर केजरीवाल यांनी दिल्लीच्या लाल किल्ला मैदानावर स्टेजवरून बाण सोडला होता तेंव्हाचा आहे.

Courtesy: Viral Post & Twitter@ArvindKejriwal

स्वतः केजरीवाल यांनीही मूळ छायाचित्र त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे.यासोबतच त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ देखील ट्विट केला होता,ज्यामध्ये ते धनुष्यबाण चालवताना दिसत आहेत.व्हायरल चित्रात एडिटिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने धनुष्य बाण उलट करण्यात आला आहे.प्रत्यक्षात केजरीवाल यांनी धनुष्यबाण सरळ पकडला होता.

आमच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की अरविंद केजरीवाल यांचे उलटा धनुष्य बाण असलेले हे छायाचित्र संपादित केले आहे,जे संभ्रम पसरवण्यासाठी शेअर केले जात आहे.

Result: Altered Photo

जर तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर, येथे क्लिक करा


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा checkthis@newschecker.in वर ईमेल करा.

Most Popular