Authors
Claim
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०२२ रोजी तामिळनाडूचा दौरा केला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली. हीच गोष्ट लक्षात घेता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, तामिळनाडूमध्ये पंतप्रधान मोदी यांचा तीव्र विरोध करण्यात आला. व्हायरल फोटोत रस्त्यावर मोठ्या अक्षरांत ‘गो बॅक मोदी’ लिहिलेलं दिसत आहे. त्याचबरोबर हा फोटो तामिळनाडू असल्याचे सांगत आहे.
Fact
फोटो गुगल रिव्हर्स करून शोधल्यावर आम्हांला मयुख रंजन घोष नावाच्या एका पत्रकाराचे ट्विट मिळाले. त्यात व्हायरल फोटो दिसत आहे. ११ जानेवारी २०२० रोजी हे ट्विट लिहिले आहे. त्यात लिहिलंय की,हा फोटो कोलकातामधील आहे.
त्याचबरोबर आम्हांला याच्याशी मिळते-जुळते काही जानेवारी २०२० मधील फोटो विविध प्रकाशित झालेल्या बातम्यांमध्ये मिळाले आहे. त्यात देखील हे फोटो कोलकातामधील असल्याचे सांगितले आहे.
त्यावेळी भारतात नागरिकत्व कायद्याला जोरदार विरोध केला जात होता. त्याच दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोलकाताचा दौरा केला. पंतप्रधानांना विरोध करण्यासाठी तेथील आंदोलकांनी रस्त्यावर ‘गो बॅक मोदी’ लिहिले होते. हा फोटो मागच्या वर्षी देखील तामिळनाडूचा असल्याचे सांगत व्हायरल झाला होता. त्यावेळी न्यूजचेकरने याचे खंडन करत या संदर्भात लेख प्रकाशित केले होते.
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, हा फोटो तामिळनाडूचा नसून कोलकातामधील आहे. तसेच हा फोटो दीड वर्षांपूर्वीचा आहे.
Result: False Content/False
(याची मूळ तथ्य पडताळणी न्यूजचेकर हिंदीने केली आहे आणि हा लेख Arjun Deodia याने लिहिला आहे)
जर तुम्हाला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख तुम्ही या दुव्यावर टिचकी मारून वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.