Wednesday, July 17, 2024
Wednesday, July 17, 2024

HomeFact CheckViralउच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी खरंच अटक केली?...

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी खरंच अटक केली? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चेहऱ्यावर काळा रंगाचा कापड बांधून उभा आहे आणि काही पोलीस कर्मचारी त्याला अटक करून नेताना दिसत आहे.

एका फेसबुक युजरने व्हायरल व्हिडिओ शेअर करत लिहिले,”हा तोच व्यक्ती आहे. ज्याने हिजाबचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. कर्नाटक पोलिसांच्या कृपेने आज पुष्पा स्टाईलने चालत आहे.”

(मूळ फेसबुक पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती चेहऱ्यावर काळा रंगाचा कापड बांधून उभा आहे आणि काही पोलीस कर्मचारी त्याला अटक करून नेताना दिसत आहे.
फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट – मै कट्टर हिन्दू

(या ट्विटची संग्रहित लिंक इथे पाहू शकता)

काही दिवसांपूर्वी कर्नाटक हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली. न्यूज नेशनच्या बातमीनुसार, या घटनेतील आरोपीला कोवई रहमथुल्ला याला तिरुनेलवेलीमधून अटक केली.

या घटनेतील दुसऱ्या आरोपीला एस. जमाल मोहम्मद उस्मानी याला तंजौरमधून पकडले. पोलिसांच्या सूत्रानुसार या घटनेत खूप लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे धमकी दिल्यानंतर कर्नाटक प्रशासनाने त्यांना सुरक्षा पुरवली.

बीबीसीच्या बातमीनुसार, कर्नाटक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रितु राज अवस्थी, न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयबुन्नेसा मोहियुद्दीन यांच्या विशेष खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले की, शाळेत हिजाब घालण्याची परवानगी दिल्यावर ‘मुस्लिम महिलांच्या मुक्तेत ती बाधा ठरेल’ आणि हे संविधानाच्या ‘सकारात्मक धर्मनिरपेक्षता’ या भावनेशी सुसंगत ठरणार नाही.

यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यात दावा केला जातोय की, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

Fact Check / Verification

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही फेसबुकवर काही कीवर्ड टाकून शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हांला नरेंद्र राठोड नावाच्या एका फेसबुक युजरने १५ मार्च २०२२ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला. 

व्हिडिओसोबत लिहिले होते,”त्याच्यावर हजारोंचे बक्षीस, पहिल्याच डझनभर घडलेल्या घटना, टीआय अमित सोनी यांना मारलेली गोळी, कित्येक वर्षापासून गायब असलेला, पण आता तस्करीत पकडला गेलेला संभागचा कुख्यात आरोपी अमजद लाला चढा मंदसौर पोलिसांच्या हाती !” 

नरेंद्र राठोड यांनी अपलोड केलेला आणि सोशल मीडियावरील व्हिडिओ एकच आहे. त्यानंतर आम्ही काही कीवर्ड गुगलवर टाकून शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हांला दैनिक भास्करने व्हिडिओसोबत प्रकाशित केलेली एक मिळाली. त्यानुसार मध्यप्रदेशातील मंदसौरच्या नई आबादी ठाण्यातील पोलिसांनी आरोपी अमजद लाला यांना अटक केली. 

अमजद लाला यांच्यावर सीतामऊ टीआय येथे गोळीबार करून फरार होण्याव्यतिरिक्त खून, खंडणी आणि तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्हांला राजधानी तक यांनी १५ मार्च २०२२ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. 

त्यामध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील काही भाग दिसत आहे. व्हिडिओ नुसार, मध्यप्रदेशातील मंदसौर पोलिसांनी ५०,००० बक्षीस असणाऱ्या अमजद लालाला अटक केली. 

याशिवाय ‘पंजाब केसरी‘ आणि ‘नई दुनिया‘ या माध्यम संस्थेनी देखील गेल्या आठवड्यातल्या मंदसौरमधील अमजद लाला यांच्या अटकेसंबंधित बातम्या प्रसिद्ध केल्या आहे. 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या तपासात स्पष्ट झाले की, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हा सोशल मीडियावर केला जाणारा दावा भ्रामक आहे. 

हा व्हायरल व्हिडिओ मंदसौरमधील आहे. व्हिडिओत दिसणारा व्यक्ती अनेक गुन्ह्यात आरोपी असणारा अमजद लाला आहे. 

Result : False Context / False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular