Sunday, January 19, 2025
Sunday, January 19, 2025

HomeFact Checkपंतप्रधान नरेंद्र मोदींची WHO च्या अध्यक्षपदी निवड झालेली नाही, जाणून घ्या सत्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींची WHO च्या अध्यक्षपदी निवड झालेली नाही, जाणून घ्या सत्य

दावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपद स्वीकारणार.


सोशल मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात याबाबतीत एक संदेश व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आरोग्य संघटनेच्या( WHO) अध्यक्षपदाचा 22 मे रोजी कार्यभार हाती घेणार आहेत. 

पतंप्रधान मोदींना जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्षपद मिळाल्याच्या बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला Republicworld.com वर एक बातमी आढळून आली यानुसार भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या एक्झिक्यूटिव्ह बोर्डात स्थान दिले आहे यात रशिया ब्रिटन आणि दक्षिण कोरिया आदि 10 देशांंचा समावेश आहे. 

याशिवाय आम्हाला इडिया टुडेच्या वेबसाईटवर 19 मे रोजीची बातमी मिळाली, ज्यात म्हटले आहे की भारत 2020-21 च्या सत्राच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहे. भारताच्या वतीने  केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन शपथ घेणार आहेत.  

याशिवाय 22 मे रोजीची टिव्ही 9 भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर बातमी आढळून आली यात डाॅ. हर्षवर्धन पहिल्या बैठकीत भाग घेणार असल्याचे म्हटले आहे. 

यावरुन हे स्पष्ट होते की जागतिक आरोग्य सघंटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद भारताला मिळालेले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष बनणार नाहीत तर केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन हे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
Source
Sharechat,Facebook, Twiiter
Result- Misleading/partly False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Most Popular