Wednesday, February 1, 2023
Wednesday, February 1, 2023

घरFact Checkदारूच्या नशेत गर्क असणाऱ्या पंजाब पोलिसाचा तो व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होतोय

दारूच्या नशेत गर्क असणाऱ्या पंजाब पोलिसाचा तो व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल होतोय

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात असा दावा केलाय की, पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयानंतर पंजाब पोलिसातील एक अधिकारी दारूच्या नशेत आढळून आला आहे.

नुकत्याच पंजाब विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात आम आदमी पार्टीने मोठा विजय मिळवला. सूबेमध्ये विधानसभेच्या ११७ जागा होत्या. ज्यात आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी ९२ जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभेसाठी भगवंत मान हा नवीन चेहरा मुख्यमंत्री पदासाठी घोषित केला. काल त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

आधी भगवंत मान यांच्यावर दारूच्या नशेत असल्याचे आरोप लागले होते. २०१९ मध्ये पंजाबमधील बरनालातील एका रॅलीत भगवंत मान यांनी दारू सोडण्याची घोषणा केली होती. त्यातच दुसरीकडे सोशल मीडियावर विरोधी पक्षाचे नेते कायमच भगवंत मान यांची दारू पिण्याबाबत मस्करी करत असतात. भगवंत मान मुख्यमंत्री झाल्यावर सोशल मीडियावर अनेक दावे व्हायरल होत आहे. न्यूजचेकरद्वारे भगवंत मान यांच्याशी निगडित भ्रामक दावे तुम्ही इथे (, ) वाचू शकता. 

यातच आता सोशल मीडियावर युजरने हा व्हिडिओ शेअर केला. त्यात पंजाबमध्ये ‘आप’च्या विजयानंतर पंजाब पोलिसातील एक अधिकारी दारूच्या नशेत आढळून आला. 

Fact Check / Verification

या सदर व्हिडिओचा तपास घेण्यासाठी आम्ही यु ट्यूबवर ‘drunk punjab cop’ हा कीवर्ड टाकला. इथे आम्हांला माहिती मिळाली की, तोच व्हिडिओ २०१७ पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

यु ट्यूबचा स्क्रिनशॉट
यु ट्यूबचा स्क्रिनशॉट

दैनिक सवेरा नावाच्या यु ट्यूब वाहिनीने २ एप्रिल २०१७ रोजी ही व्हायरल क्लिप अपलोड केली होती. त्यांनी हा व्हिडिओ ‘Watch Viral video : Punjab Police in drunken look’ या शीर्षकासोबत शेअर केला आहे.  पण त्या वाहिनीने व्हिडिओत दिसणारा तो पोलीस अधिकारी कोण आहे, याबाबत कुठलीच माहिती नाही. 

याच बरोबर आम्हांला माहिती मिळाली की, Daily Post India नावाच्या यु ट्यूब वाहिनीने १ ऑगस्ट २०१७ रोजी एक व्हिडिओ प्रकाशित केला होता. 

या व्यतिरिक्त Pratik Chib, Virul Videos आणि Gopal Chouhan नावाच्या यु ट्यूब वाहिनीवरती हा व्हायरल व्हिडिओ आढळून आला. 

Conclusion 

या पद्धतीने आमच्या तपासात ही गोष्ट स्पष्ट झाली की, हा व्हायरल व्हिडिओ पंजाबमधील ‘आप’च्या विजयानंतरचा नाही. हा व्हायरल व्हिडिओ २०१७ पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. पण नेमका हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, ते आम्हांला समजू शकले नाही. आम्हांला जर व्हिडिओशी संबंधित काही माहिती मिळाली तर आम्ही लेख अपडेट करू. 

Result : False Context / False

Our Sources


Daily Post English द्वारे यु ट्यूब व्हिडिओ

Dainik Savera द्वारे यु ट्यूब व्हिडिओ

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular