Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: कतारने 8 भारतीयांची शिक्षा माफ केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे

Fact Check: कतारने 8 भारतीयांची शिक्षा माफ केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
कतारने सर्व 8 भारतीयांची फाशीची शिक्षा रद्द केली आहे.
Fact
व्हायरल झालेला दावा खोटा आहे, कतार सरकारने अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

सोशल मीडियावर आखाती देश कतारमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या 8 भारतीयांसंदर्भात दावा व्हायरल होत आहे. व्हायरल दावा सांगत आहे की “कतारने 8 जणांची फाशीची शिक्षा रद्द केली आणि भारताची मैत्री अधिक महत्त्वाची असल्याचे सांगितले”.

तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा खोटा आहे. कतार सरकारने अद्याप अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

26 ऑक्टोबर 2023 रोजी, कतारी न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली सात माजी भारतीय नौदल अधिकारी आणि एका खलाशी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हे सर्व भारतीय नागरिक कतारची राजधानी दोहा येथील अल दहरा या खासगी कंपनीत काम करत होते. या शिक्षेविरोधात भारत सरकारने कतारच्या उच्च न्यायालयात अपीलही दाखल केले आहे. या अपिलाची पहिली सुनावणी 30 नोव्हेंबर रोजी झाली असून पुढील सुनावणी 7 डिसेंबर रोजी होणार आहे.

फेसबुकवर व्हायरल दावा शेअर करताना, “कतारने 8 जणांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची घोषणा केली, भारतासोबत मैत्री अधिक महत्त्वाची आहे” असे कॅप्शन लिहिले आहे.

Fact Check: कतारने 8 भारतीयांची शिक्षा माफ केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे
 Courtesy: FB/pradeep.tanwar.73700

Facebook वर उपलब्ध व्हायरल दाव्याशी संबंधित इतर पोस्ट इथे, इथे आणि इथे पाहू शकता.

Fact Check/Verification

व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, Newschecker ने प्रथम संबंधित कीवर्डच्या मदतीने Google सर्च केला. आम्हाला व्हायरल दाव्याचा उल्लेख करणारा कोणताही न्यूज रिपोर्ट सापडला नाही.

यानंतर, आम्ही भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे अधिकृत X खाते देखील शोधले. यावेळी आम्हाला त्याच्या X खात्यावर व्हायरल दाव्याची पुष्टी करणारे कोणतेही अलीकडील ट्विट आढळले नाही.

तपासादरम्यान, आम्हाला 1 डिसेंबर 2023 रोजी हिंदुस्तान टाईम्स वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. या रिपोर्टमध्ये भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी यांनी या संदर्भात दिलेले विधान आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, “कतारमध्ये उपस्थित असलेले सर्व माजी नौदल अधिकारी खूप अनुभवी आहेत. भारत सरकार या सर्वांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

Fact Check: कतारने 8 भारतीयांची शिक्षा माफ केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: HT

यानंतर, आमचा तपास पुढे नेत, आम्ही अरब आधारित फॅक्ट चेकिंग आउटलेट मिसबारचे फॅक्ट चेकर बयान हमदान यांच्याशीही संपर्क साधला. त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन केले आणि सांगितले की “कतार सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही”.

26 ऑक्टोबर 2023 रोजी कतार न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली 7 माजी नौदल अधिकारी आणि एका खलाशीला फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्व भारतीयांना ऑगस्ट 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. “कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर अमित नागपाल, कमांडर एसके गुप्ता, कमांडर बीके वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला आणि नाविक रागेश.” अशी कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या भारतीयांची नावे आहेत.

आमच्या तपासात आम्ही परराष्ट्र मंत्रालय आणि फाशीची शिक्षा झालेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांचा प्रतिसाद मिळताच हा लेख अपडेट केला जाईल.

Conclusion

कतारमधील भारतीयांची शिक्षा माफ झाल्याचा व्हायरल दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
HT Website: Report Published on 1st Dec 2023
Conversation With Misbar Fact Checker Bayan Hamdan


(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular