Thursday, February 2, 2023
Thursday, February 2, 2023

घरFact CheckReligion१५ मुलांचा बाप असलेला मुस्लिम व्यक्ती खरंच भारतातील आहे? जाणून घ्या सत्य...

१५ मुलांचा बाप असलेला मुस्लिम व्यक्ती खरंच भारतातील आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओद्वारे भारतीय मुस्लिम समुदायावर निशाणा साधला आहे. त्यात असं म्हटलंय की, भारतातील मुस्लिमांमुळे लोकसंख्या अशा पद्धतीने वाढत आहे की, काही वर्षात देशात पाय ठेवायला देखील जागा उरणार नाही.

व्हायरल व्हिडिओत एक पत्रकार मुस्लिम व्यक्तीला विचारत आहे की, तुमची किती मुलं आहेत ? त्यावर त्याने उत्तर दिले,”१५ मुले आहे.” त्या व्हिडिओत आपल्याला काही मुले देखील दिसत आहे.

या ट्विटची संग्रहित लिंक तुम्ही इथे पाहू शकता.

हा व्हिडिओ या दाव्यासोबत फेसबुक आणि ट्विटरवर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तर काही लोकं मागणी करत आहे की, लोकसंख्या नियंत्रण कायद्याची आता आवश्यकता आहे.

Fact Check / Verification

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो व्हिडिओ पुन्हा पाहिला. तेव्हा त्यात आम्हांला लीडर टीव्हीचा एक लोगो दिसला. त्यानंतर युट्यूबवर शोधल्यावर आम्हांला ती वाहिनी मिळाली. या वाहिनीवर ११ एप्रिल २०२२ रोजी एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात व्हायरल व्हिडिओचे काही दृश्य आपण पाहू शकतो.

यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, या यु ट्यूब वाहिनीवरील व्हिडिओसोबत ‘पाकिस्तान’चा हॅशटॅग दिसत आहे. व्हिडिओत जो मजकूर लिहिलाय, तो देखील उर्दूमध्येच लिहिला आहे. या वाहिनीच्या ‘अबाउट’ या विभागांत त्याचे ठिकाण पाकिस्तान दाखवत आहे.

वाहिनीवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओसोबत लीडर टीव्हीच्या काही लोकांचे नाव देखील लिहिले आहे. त्यानुसार, लीडर टीव्हीचे प्रमुख अली अहमद ढिल्लन नावाचा व्यक्ती आहे. मग आम्ही फेसबुकवर हे नाव टाकून शोधले. तेव्हा आम्हांला अली अहमद ढिल्लन या नावाचे एक फेसबुक पान सापडले. त्या पानावर लिहिलंय की, अली अहमद ढिल्लन हे एक पत्रकार आणि लीडर समूहाचे सीईओ आहे.

त्या फेसबुक पानावर एक संपर्क क्रमांक देखील लिहिला आहे. आम्ही अली अहमद ढिल्लन यांच्याशी फेसबुकवर संपर्क साधला. त्यांनी न्यूजचेकरच्या बोलण्याला दुजोरा देत सांगितले की, हा व्हिडिओ पाकिस्तानच्या लाहोरमधील आहे. 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही तर पाकिस्तानातील आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भ्रामक दाव्यासोबत शेअर केला जात आहे.

Result : False Context/False

Our Sources

११ एप्रिल २०२२ रोजी लीडर टीव्हीवर यु ट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ

लीडर समूहाचे सीईओ अली अहमद ढिल्लन यांच्याशी झालेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular