Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact CheckFact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही, खोटा आहे...

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही, खोटा आहे हा दावा

Authors

Kushel HM is a mechanical engineer-turned-journalist, who loves all things football, tennis and films. He was with the news desk at the Hindustan Times, Mumbai, before joining Newschecker.

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
मार्गारेट लॉरेन्स नामक महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1908 मध्ये दोषी ठरल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगवास घडला होता.
Fact
हा दावा खोटा आहे. 1908 मध्ये मार्गारेट लॉरेन्स नावाच्या इंग्रज महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल सावरकरांच्या अटकेचे कोणतेही अधिकृत वृत्त नाही.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर अनेकदा अनेक प्रश्न उपस्थित करून वाद निर्माण केले जातात. सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल यापूर्वी अनेकदा सोशल मीडियावर वादळे उठविण्यात आली. आता त्यांच्या तुरुंगवारीबद्दल वाद निर्माण करणारा एक दावा केला जात आहे.

सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले. असे हा दावा सांगतो. फेसबुकवर हा दावा केला जात असल्याचे आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून व्हायरल झाल्याचे आमच्या निदर्शनास आले.

सध्या चतुरस्त्र अभिनेता रणदीप हुडा निर्मित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर‘ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपटाचे टिझर रिलीज झाले आहे आणि प्रदर्शनाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याच निमित्ताने सोशल मीडियावर पुन्हा एकदा सावरकरांवर आरोप करणारे काही दावे पसरू लागले आहेत. विशेषतः हा दावा करताना वापरण्यात आलेला फोटोही मूळ सावरकरांचा नसून अभिनेता रणदीप हुडा याचा सावरकरांच्या रुपातला फोटो आहे.

न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला आहे.

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही खोटा आहे हा दावा

Fact check/ Verification

न्यूजचेकरने प्रथम “सावरकर बलात्कार”, “सावरकर मार्गारेट लॉरेन्स” या शब्दांसाठी कीवर्ड शोधले, ज्यात कोणतेही अधिकृत रेकॉर्ड किंवा कथित गुन्ह्यासाठी सावरकरांना अटक झाल्याची नोंद सापडली नाही.

सावरकरांच्या संदर्भात मार्गारेट लॉरेन्सचे एक-दोन उल्लेख आम्हाला आढळले. इतिहासकार विक्रम संपत यांच्या ‘Savarkar: Echoes from a Forgotten Past, 1883-1924’ या पुस्तकानुसार, “ब्रिटिश एजन्सींनी रचलेल्या (honey-trap) मधाच्या सापळ्याला, अर्थात लॉरेन्स मार्गारेटला बळी पडल्याचे त्यांच्यावर इतरही आरोप आहेत. या आरोपाला कोणताही आधार नाही आणि त्या महिलेबद्दल कोणताही संदर्भ किंवा तपशील उपलब्ध नाही.”

सावरकरांवर आरोप करणारी असाच दावा असणारी पोस्ट यापूर्वी अभिनेत्री मोना आंबेगावकर यांनी केली होती. संपत यांनी आंबेगावकर यांच्या ट्विटवरही टीका केली असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. “Totally fake news. There is no mention of such an incident in any of the British records or case files of the Nashik murder case and the thousands of pages of conspiracy cases. A picture of vile imagination! @RanjitSawarkar” याचा मराठी अर्थ पुढीलप्रमाणे आहे. “संपूर्णपणे फेक न्यूज. नाशिक मर्डर केस आणि कट रचल्याच्या केसच्या हजारो पानांच्या कोणत्याही ब्रिटीश रेकॉर्डमध्ये किंवा केस फाईल्समध्ये अशा घटनेचा उल्लेख नाही. नीच कल्पनेचे चित्र! @रणजितसावरकर”

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही खोटा आहे हा दावा

आंबेगावकरांच्या दाव्याला उत्तर म्हणून वैभव पुरंदरे, इतिहासकार आणि “सावरकर: द ट्रू स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व” चे लेखक यांनी ट्विट केले आहे. “सावरकरांचा चरित्रकार म्हणून मी हे खोटे असल्याची पुष्टी करू शकतो. #ब्रिटिशांनी #सावरकरांच्या विरोधात मोठे रेकॉर्ड ठेवले. असे घडले असते तर त्यांनी याचा उल्लेख केला नसता का? सावरकरांशी लोक प्रत्येक विषयावर असहमत असू शकतात पण इतिहासाच्या नावाने खोटेपणा का पसरवता? असे ते ट्विट मध्ये म्हणतात.

आम्ही पुरंदरे यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा पुनरुच्चार केला. “सावरकरांवर कधी अशा आरोपांचा सामना करावा लागला किंवा अशा गुन्ह्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असे दर्शविण्यासारखे काही नाही. 1906 मध्ये जेव्हा ते लंडनला गेले तेंव्हापासून ब्रिटिशांची त्यांच्यावर बारीक नजर होती. सातत्याने म्हणजेच किशोरवयीन काळापासून ब्रिटिशांनी त्यांना धोकादायक असेच म्हणून गणले होते. सर्व प्रकारच्या प्रकरणांमध्ये त्याना दोषी ठरवण्यासाठी त्यांनी सबळ पुरावे एकत्र ठेवले. असे घडले असते तर त्यांनी अशा गोष्टीचा उल्लेख केला नसता का? किंबहुना त्याबाबत ब्रिटिशांनी एक मोठे हत्यार म्हणून पाहिले असते. त्यांनी सावरकरांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा नष्ट केली असती, कारण सावरकरांना शांत करण्यासाठी काहीतरी ते करू पाहत होते. लोक सावरकरांशी असहमती करण्यास मोकळे आहेत, परंतु इतिहासाच्या नावाखाली खोटेपणा पसरवणे हे अन्यायकारक आणि इतिहासाचा मोठा अपमान आहे,” असे ते म्हणाले.

मार्गारेट लॉरेन्स विषयावर, पुरंदरे म्हणाले की हे नाव सावरकरांच्या लंडनला परतण्याच्या वेळी आले आणि ते का परतले असा प्रश्न निर्माण झाला. “तेव्हा एक सिद्धांत मांडला गेला होता तो म्हणजे प्रेम, आणि तिथेच या नावाने कोणीतरी उल्लेख केला होता,” असे पुरंदरे म्हणाले.

आम्हाला टेलीग्राफचा एक लेख देखील सापडला, ज्यात असे म्हटले आहे की, “डिसेंबरमध्ये, त्यांचे धाकटे भाऊ, नारायणराव यांना व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो यांच्या खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती (नंतर ते निर्दोष ठरले). 21 डिसेंबर रोजी नाशिकचे कलेक्टर A.M.T. जॅक्सन यांची थिएटरमध्ये हत्या करण्यात आली. सावरकरांनी त्यांच्या मारेकऱ्यांनी वापरलेली पिस्तूल पाठवल्याचे निष्पन्न झाले. 17 जानेवारी 1910 रोजी नाशिकमधील विशेष दंडाधिकारी यांनी त्यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले. सावरकर पॅरिसला पळून गेले, परंतु नंतर 13 मार्च रोजी अचानक लंडनला परतले. असे मानले जाते की ते मार्गारेट लॉरेन्स अर्थात त्यांच्या मैत्रिणीच्या विरहाने आले, मात्र सावरकर समर्थक या गोष्टीचा विरोध करतात.”

आंबेगावकरांच्या दाव्याशी समान ट्विट शोधण्याचा प्रयत्न करताना, आम्हाला पत्रकार निरंजन टकले यांचे 2017 चे ट्विट आढळले, ज्यात म्हटले होते की, “लंडनमधील एका ब्रिटीश महिलेचा विनयभंग केल्याबद्दल सावरकरांना प्रथम 1908 मध्ये 4 महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागला होता.

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही खोटा आहे हा दावा
Screenshot of tweet by @niranjan_takle

त्यानंतर न्यूजचेकरने टकले यांच्याशी ईमेलद्वारे संपर्क साधला आणि आंबेगावकर यांच्या दाव्याची चौकशी केली. ते म्हणाले की हा दावा “पूर्णपणे बरोबर आहे” आणि “मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आर.ए. जहागीरदार” यांनी त्याबद्दल लिहिले आहे. पण तपासणीवरून असे दिसून आले की त्यांनी कधीही मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषवले नाही, तर ते न्यायाधीशांपैकी एक होते. बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाइटवर त्याचे बायो येथे आहे. बायोनुसार, त्यांची 24-11-1977 रोजी स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 15-8-1990 रोजी निवृत्त झाले. 15 ऑगस्ट 1928 रोजी जन्मलेल्या या न्यायाधीशाचे 23 फेब्रुवारी 2011 रोजी निधन झाले.

“न्यायमूर्ती आर.ए. जहागीरदार सावरकर” या गुगल सर्चमुळे आम्हाला न्यायमूर्ती आर.ए. जहागीरदार (निवृत्त) यांच्या “मेमोयर्स ऑफ अ रॅशनलिस्ट” या पुस्तकाकडे नेले. बुद्धिवाद, मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षता यावरील लेखांचे संकलन म्हणून या पुस्तकाचे वर्णन केले गेले आहे.

“हिंदू धर्मावर दृढ विश्वास असलेले पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने सावरकर शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. “अभिनव भारत” या भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी संघटनेचे कार्यकर्ते, सावरकरांनी अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतला. धनंजय कीर यांनी नमूद केले आहे की, 1908 मध्ये, एका इंग्रज मुलीच्या विनयभंगासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले आणि परिणामी चार महिने तुरुंगवास भोगावा लागला,” या शीर्षकाच्या प्रकरणातील पुस्तकातील पृष्ठ 139 वर, “वीर सावरकर खरोखरच ‘वीर’ होते का? ” या शीर्षकाखाली लिहिलेले आढळते.

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही खोटा आहे हा दावा
Screenshot of the page

त्यानंतर आम्ही धनंजय कीर यांचे “वीर सावरकर” नावाचे सावरकरांचे चरित्र पाहिले, जे 1950 मध्ये प्रथम प्रकाशित झाले होते. या पुस्तकात सावरकरांच्या एका अगम्य गुरूशी पुणे येथे झालेल्या भेटीचे वर्णन केले आहे. पुस्तकाच्या पृष्ठ 24 नुसार, “The Agamya Guru was as abstruse as his name. But more ridiculous was the invention of the detectives that traced Savarkar’s inborn spring of inspiration to the mystic…Nobody knows what happened to this mystic except that early in 1908 he was found guilty of outraging the modesty of an English girl in London and released after undergoing a term of four months in British jail.”

त्यानंतर आम्ही “अगम्य गुरू सावरकर” या कीवर्डचा शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला सावरकरांनी स्वतः लिहिलेले “Inside the Enemy Camp” नावाचे पुस्तक मिळाले. सावरकरांचा आगम्य गुरूवर एक उपअध्याय होता, जिथे त्यांनी पृष्ठ 62-63 वर लिहिले, “माझा गुरूंशी संपर्क फारच कमी होता…जेव्हा मी रत्नागिरीत होतो, तेव्हा मी टिळकांचे अनुयायी दादाराव करंदीकर यांना भेटलो. अगम्य गुरूबद्दल त्यांनी हेच सांगितले. ‘मी 1908 मध्ये लंडनमध्ये अगम्य गुरूंना भेटलो आणि नंतर एका इंग्रज मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले.’ ही माहिती श्री. करंदीकर यांच्या ‘लेटर्स फ्रॉम इंग्लंड’ या पुस्तकात आहे. ते पुढे म्हणतात, ‘मी अगम्य गुरूंना भेटलो नंतर त्यांनी शिक्षा भोगली आणि तोच शेवट ठरला.’

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही खोटा आहे हा दावा
Screenshot of the page

त्यानंतर आम्ही या निष्कर्षांवर टिप्पणीसाठी पुरंदरे यांच्याशी संपर्क साधला. प्रतिसाद मिळाल्यावर आम्ही हा लेख अपडेट करू.

न्यूजचेकरला 12 जुलै 1908 रोजी प्रसिद्ध झालेला न्यूयॉर्क टाईम्सचा लेख देखील सापडला, ज्यामध्ये अगम्य गुरूच्या अटकेबद्दल माहिती देण्यात आली होती.

Fact Check: सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले? नाही खोटा आहे हा दावा
Screenshot of the page from the New York Times

Conclusion

1908 मध्ये मार्गारेट लॉरेन्स नावाच्या एका इंग्रज महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल व्ही.डी. सावरकरांना अटक झाल्याचा कोणताही अधिकृत रिपोर्ट नाही. सावरकरांच्या चरित्रकारांनी पुष्टी केली की त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारच्या कोणत्याही केसेसच्या नोंदी नाहीत, तर आमच्या संशोधनात असे आढळून आले की कथित घटना ही अगम्य गुरु नामक व्यक्तीशी संबंधित होती.

ResultFalse

Our Sources
Tweet by Vikram Sampath, historian and biographer
Conversation with Vaibhav Purandare, historian and biographer
Telegraph report, October 2004
Veer Savarkar, book by Dhananjay Keer
Memoirs of a Rationalist, book by Justice RA Jahagirdar (Retd)
Inside the Enemy Camp, book by VD Savarkar
New York Times report, July 12, 1908


(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीतही सर्वप्रथम कुशल एच एम यांनी केले होते.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Kushel HM is a mechanical engineer-turned-journalist, who loves all things football, tennis and films. He was with the news desk at the Hindustan Times, Mumbai, before joining Newschecker.

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular