Sunday, April 27, 2025
मराठी

Fact Check

अभिनेता शाहरुखच्या पाक क्रिकेट संघावरील वक्तव्याची जुनी व्हिडिओ क्लिप दिशाभूल करीत झाली व्हायरल

banner_image

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम शुभम सिंग यांनी केले आहे.)

चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट पुढील महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. त्याआधी, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुखचे पाकिस्तान प्रेमी म्हणून वर्णन केले जात आहे आणि त्याच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख म्हणतोय, ‘मी सुद्धा पठाण आहे आणि जेव्हा पाकिस्तान जिंकतो तेव्हा मला वाटते की माझे वडील जिंकले आहेत.’

 अभिनेता शाहरुखच्या पाक क्रिकेट संघावरील वक्तव्याची जुनी व्हिडिओ क्लिप दिशाभूल करीत झाली व्हायरल
Courtesy: Facebook/Roopesh Goswami
Courtesy: Twitter@GemsofNamo

शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावर आक्षेप नोंदवून अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही एक निवेदन जारी करून चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडियावरही, अनेक युजर्सनी शाहरुख खानबद्दल अनेक दावे केले आहेत, आम्ही यापैकी काही दाव्यांचे तथ्य तपासले आहे, जे तुम्ही येथे आणि येथे वाचू शकता.

Fact Check/ Verification

दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्डच्या मदतीने हा व्हिडिओ YouTube वर शोधला. आम्हाला शाहरुख फॅनक्लबच्या YouTube चॅनेलवर 11 वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओचे भाग पाहिले जाऊ शकतात.

या व्हिडिओमध्ये शाहरुख खान म्हणत आहे, “एक बात मैं आप लोगों को बताना चाह रहा हूं यार। दरअसल, मेरे वालिद  पाकिस्तान (पेशावर) से हैं। मैं भी पठान हूं, लगता नहीं हूं, तबियत मेरी नासाज रहती है, लेकिन मैं भी पठान हूं। थोड़ी हाइट कम है मेरी। और ये मैं कोई विवाद खड़ा करने के लिए नहीं कह रहा। जब आप लोग जीतते हैं तो मुझे लगता है वालिद की साइड जीत गई, और जब हमारी इंडिया जीत गई तो लगता है कि अम्मी की साइड जीत गई। मेरे वालिद का इंतकाल बहुत जल्दी हो गया वर्ना मैं चाह रहा था कि ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड की महिलाओं से भी शादी कर लेते तो सारी साइड जीतती तो मैं खुश रहता। हालांकि, खेल का पूरा मकसद केवल जीत या हार नहीं है, ये एक खेल भावना होती है जिसके लिए आप लोग खेलते हैं। मैं पाकिस्तान और भारत के अलावा सभी टीमों का धन्यवाद करना चाहता हूं, क्योंकि आप सभी बहुत बेहतरीन हैं।” यावरून हे स्पष्ट झाले आहे की, शाहरुख खानच्या संपूर्ण विधानापैकी अर्धेच वक्तव्य सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.

तपासादरम्यान, आम्ही Google वर काही कीवर्ड शोधले. डेलीमोशनच्या पेजवर आम्हाला 2007 मध्ये अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. यामध्येही सुमारे चार मिनिटे 19 सेकंदांवर व्हायरल व्हिडिओचा काही भाग पाहता येतो. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, सहारा परिवाराने 2007 मध्ये लखनऊमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Courtesy: Daily Motion

Conclusion

त्यामुळे शाहरुख खानच्या वक्तव्याचा अर्धा भाग शेअर करून संभ्रम पसरवला जात असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. शाहरुख खान क्रिकेटमध्ये पाकिस्तान जिंकतो तेव्हा आनंदी होतो असे बोलला होता, पण पुढे व्हिडिओमध्ये भारत जिंकल्यावरही आनंदी होत असल्याचे त्याने नमूद केले आहे.

Result: Missing Context

Our Sources
Video Uploaded by ShahrukhsFANSCLUB in 2012

Video Uploaded by DailyMotion in 2007

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,944

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.