Thursday, April 17, 2025
मराठी

Fact Check

Fact Check: अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये ‘श्री रुद्रम स्तोत्राचे’ पठण झाले? खोटा आहे हा दावा

Written By Sabloo Thomas, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Sep 5, 2023
banner_image

Claim
अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये श्री रुद्रम स्तोत्राचे पठण करण्यात आले.
Fact
व्हायरल व्हिडीओ 2018 मध्ये क्रोएशियामध्ये वैदिक संघाच्या माध्यमातून झालेल्या श्री रुद्र स्तोत्र पठणाचा आहे.

“अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये “श्री रुद्रम स्तोत्राचे” पठण, इतके शुद्ध उच्चारण अमेरिकन करु शकतात याची कल्पनाही करु शकत नाही आणि आपण भारतीय काय करतोय ? आपण कुठे आहोत? अतिशय गर्वाचा विषय आहे की? “श्री रुद्रम स्तोत्राचे” Jefry Arhard यानी व्हाइट हाऊस मध्ये पठण केले. डोळे बंद करून, शांतपणे ऐका. अतिशय अप्रतिम व्हिडिओ आहे” अशा कॅप्शनखाली एक रुद्र पठण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये 'श्री रुद्रम स्तोत्राचे' पठण झाले? खोटा आहे हा दावा

Fact Check/ Verification

आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा रिव्हर्स इमेज शोध घेतला. आम्हाला हा व्हिडिओ 16 जुलै 2018 रोजी द वर्ल्ड ऑफ डिव्हाईन या फेसबुक पेजवर पोस्ट झाल्याचे आढळून आले.

या पोस्टला “Shri Rudram and Chamakam performed by 400+ Europeans in Croatia. The European Veda association would be performing this across many places in Europe for world peace. Amazing! Absolutely proud to be born in the lineage of Vedic tradition. Looks like others are picking up where we left it.” अशी कॅप्शन पाहायला मिळाली. याचा अर्थ “क्रोएशियामधील 400+ युरोपियन लोकांनी श्री रुद्रम आणि चमकम सादर केले. युरोपियन वेद असोसिएशन जागतिक शांततेसाठी युरोपमधील अनेक ठिकाणी हे कार्य करणार आहे. आश्चर्यकारक! वैदिक परंपरेच्या वंशात जन्म घेतल्याचा अभिमान आहे. आम्ही जिथे सोडले होते तेथून इतर लोक उचलत आहेत असे दिसते.” असा आहे.

14 मे 2018 रोजी, स्वामी परिपूर्णानंद – इंग्रजी या आयडीनेही याच वर्णनासह ही पोस्ट शेअर केली.

Fact Check: अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये 'श्री रुद्रम स्तोत्राचे' पठण झाले? खोटा आहे हा दावा
Courtesy: Facebook/ Swami Paripoornanada- English

युरोपियन वैदिक असोसिएशनच्या वेबसाइटवर या कार्यक्रमाचे वर्णन दिले आहे. हा कार्यक्रम क्रोएशियाच्या झाग्रेब शहरात 3, 4 मार्च 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.

Fact Check: अमेरिकेत व्हाईट हाऊस मध्ये 'श्री रुद्रम स्तोत्राचे' पठण झाले? खोटा आहे हा दावा
From Veda Union website

Conclusion

व्हायरल झालेल्या व्हिडिओतील रुद्र स्तोत्राचे पठण व्हाईट हाऊसमध्ये झाले नसल्याचे आमच्या तपासातून समोर आले आहे. 2018 मध्ये क्रोएशियामध्ये वैदिक संघाच्या आश्रयाने श्री रुद्रस्तोत्र पठण झाले होते त्याचा व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल करण्यात आला आहे.

Result: False

Sources
Facebook post by World Of Divine on July 16, 2018
Facebook post by Swami Paripoornananda – English on May 14, 2018
Information on the Veda Union website


(हे आर्टिकल न्यूजचेकर मल्याळम साठी सर्वप्रथम सबलू थॉमस यांनी केले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,830

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.