Tuesday, November 19, 2024
Tuesday, November 19, 2024

HomeFact Checkव्हायरल झालेला व्हिडिओ ही खरी घटना नसून स्क्रिप्टेड ड्रामा आहे

व्हायरल झालेला व्हिडिओ ही खरी घटना नसून स्क्रिप्टेड ड्रामा आहे

एका शाळकरी मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी बसस्टॉपवरून पळवून नेल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना असा दावा केला जात आहे की, शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला दोन तरुणांनी अंमली पदार्थांचा वास देऊन तिच्याशी ‘गैर कृत्य’ करण्यासाठी तिला पळवले होते.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन तरुण त्या मुलीला बस स्टँडमध्ये शाळेच्या ड्रेस मध्ये उभी असताना आपल्या बाईकवर बसवून पुढे निघून जातात. पाठीमागच्या गाडीत बसलेला त्यांचा व्हिडिओ बनवणारा तरुण त्यांचा पाठलाग करतो आणि थोडं पुढे जाऊन त्यांना थांबवतो. सुरुवातीला ही मुलगी आपल्या घरची असल्याचा दावा दोन्ही बाइकस्वार करतात, मात्र गाडीतील तरुणाने त्यांना मारहाण केली असता, दोघेही मुलीला पळवून नेत असल्याची कबुली देतात.

नागरिकांनी सावध राहावे, या अल्पवयीन मुलीला जसे पळविण्यात आले तसेच तुमच्या शहरातही होऊ शकते, असे सांगून ही पोस्ट फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर व्हायरल करण्यात येत होती.

Courtesy: Fb- मेहरबान सिंह राजपूत केलोद

Fact Check/ Verification

तपासादरम्यान, आम्हाला 14 ऑगस्ट 2022 रोजी यूट्यूब वर नवीन जांगरा यांच्या व्हेरिफाइड यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. मात्र, व्हिडिओत कुठेही स्क्रिप्टेड किंवा प्रत्यक्ष घटना असा उल्लेख करण्यात आलेला नाही. किंवा शीर्षकातही कोणतीही माहिती दिलेली नाही.

यानंतर आम्ही यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असलेले इतर व्हिडीओज तपासले. या दरम्यान, आम्हाला आढळले की व्हायरल व्हिडिओमध्ये, पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला नवीन – पुढच्या आणि मागील दोन्ही बाजूंनी मुद्रित – इतर व्हिडिओंमध्येही दिसला होता.

5 ऑगस्ट 2022 रोजी अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये नवीन जांगरा याच टी-शर्टमध्ये दिसत आहे. या व्हिडिओसोबत डिस्क्लेमर देण्यात आला असून, त्यानुसार व्हिडिओत दाखवलेल्या घटनेचा विचार केवळ मनोरंजनाच्या उद्देशानेच करण्यात यावा.असे म्हटले आहे.

याशिवाय 12 जुलै 2022 च्या आणखी एका व्हिडिओमध्ये युट्यूबर नवीन जांगरा याच पिवळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. व्हिडिओच्या डिस्क्लेमरनुसार, व्हिडिओत दाखवलेल्या घटनेचा विचार केवळ मनोरंजनाच्या उद्देशानेच केला पाहिजे.असे म्हटलेले आहे.

तपासादरम्यानच आम्हाला 30 जून 2022 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये नवीन त्याच वेशभूषेत दिसतो. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओही केवळ मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे.

Conclusion

या तीन व्हिडिओंमध्ये दाखवण्यात आलेल्या कथांमध्ये नवीन हा वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. आणि व्हिडिओच्या माहितीत, या व्हिडिओंचे वर्णन वास्तविक घटना नव्हे तर करमणुकीसाठी बनवलेली सामग्री म्हणून केले गेले आहे.

आम्ही व्हायरल व्हिडिओ आणि इतर व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्यामध्ये तुलनात्मक विश्लेषण केले आहे. ज्यामुळे आपण या निष्कर्षाप्रत पोहोचतो की व्हायरल व्हिडिओ देखील एक स्क्रिप्टेड नाट्य आहे, वास्तविक घटना नाही.

Result: False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular