Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
बाबरी मशीद पाडविण्यात आलेली जागा भग्न अवस्थेत पडून आहे आणि अयोध्येत या जागेपासून तीन किलोमीटर दूर राम मंदिर उभारण्यात आले आहे.
Fact
बाबरी मशीद पाडविण्यात आलेल्या जागेवरच राम मंदिर उभारले जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.
अयोध्या राम मंदिराचे उदघाटन आणि राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना असा कार्यक्रम अयोध्येत २२ जानेवारीला होईल. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर असंख्य पोस्ट पाहायला मिळत आहेत. दरम्यान एक वादग्रस्त दावा करणारी पोस्ट मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे. बाबरी मशीद पाडविण्यात आलेली जागा भग्न अवस्थेत पडून आहे. या जागेपासून तब्बल तीन किलोमीटर अंतरावर राम मंदिर उभारले जात आहे. असा दावा केला जात आहे. एका गुगल मॅपच्या स्क्रिनशॉटचा वापर या पोस्टसाठी केला जात आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना यासंदर्भातील दावा केला. या दाव्याची बातमी झाली.
यानंतर संजय राऊत यांच्या व्हिडिओला पोस्ट करीत अनेक युजर्सनी हा दावा सोशल मीडियावर पसरविला. स्वतः संजय राऊत यांनीही या दाव्याला रिपोस्ट केले.
यानंतर गुगल मॅपच्या एका ठराविक स्क्रिनशॉटचा वापर करीत असंख्य युजर्सनी हा दावा सोशल मीडियावर पसरविण्यास प्रारंभ केला.
आम्हाला हा दावा व्हाट्सअप टिपलाइन (9999499044) वर देखील प्राप्त झाला असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
जास्तीतजास्त व्हायरल पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या गुगल मॅपच्या स्क्रिनशॉटचे आम्ही बारकाईने निरीक्षण केले.
आम्हाला यामध्ये दोन ठिकाणे लाल रंगाने वर्तुळाकार करून दाखविण्यात आल्याचे आणि त्यामधील तीन किलोमीटरचे अंतर दाखविण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करून रेघोट्या मारल्या असल्याचे निदर्शनास आले. आम्ही हा मॅप पाहिला असता एक ठिकाणचे वर्णन ‘श्री राम जन्मभूमी मंदिर’ असे करण्यात आले असल्याचे पाहायला मिळते. दुसरे ठिकाण बारकाईने पाहिले असता तेथे बाबरी नव्हे तर ‘बाबर मशीद’ असा उल्लेख आम्हाला पाहायला मिळाला. मॅप मध्ये आजूबाजूला असलेल्या ठिकाणांवरून आम्ही दोन्ही ठिकाणांचा गुगल मॅपवरच शोध घेतला.
पहिले ठिकाण हे राम जन्मभूमी मंदिराचेच असल्याचे गुगल मॅपच्या सॅटेलाईट व्ह्यू वरून स्पष्ट होते.
दुसऱ्या ठिकाणाबद्दल जाणून घेण्यासाठी, आम्ही ते Google Map वर शोधले आणि आढळले की अयोध्येतील या ठिकाणी सीता-राम बिर्ला मंदिर आहे.
व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यावर बाबरी मशीद नव्हे तर बाबर मशीद लिहिले आहे. यासंबंधित माहिती गोळा करण्यासाठी आम्ही Google Maps वर शोधले तेव्हा आम्हाला आढळले की सीता-राम बिर्ला मंदिरावर हे चुकीचे मार्किंग करण्यात आले होते, या मशिदीच्या पुनरावलोकनात बाबरी मशिदीचे चित्र अपलोड करण्यात आले होते.
यानंतर आम्ही Google Earth Pro वर अयोध्येत बांधले जाणारे श्री रामजन्मभूमी मंदिर शोधले. आम्हाला 2023 मध्ये घेतलेल्या नवीनतम उपग्रह प्रतिमेत आढळले की, या ठिकाणी मंदिरासारखी रचना बांधण्यात आली आहे.
श्री राम जन्मभूमी मंदिराचे संबंधित लोकेशन आणि Google Earth Pro वरील लोकेशन समान असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
पडताळणीसाठी आम्ही श्री राम मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांच्याशी संपर्क साधून व्हायरल दाव्यासंदर्भातील सत्य विचारले असता, त्यांनी ” भगवान श्रीरामाचे जन्मस्थान हा असंख्य वर्षांपासून संघर्षाचा मुद्दा बनला होता. १५२८ मध्ये बाबरने हे जन्मस्थान पाडले होते. तेंव्हापासूनच हिंदू समाजाचा संघर्ष सुरु आहे. हे ठिकाण बदलून मंदिर बनविण्याची गोष्ट असती तर हा संघर्ष आणि वादच तयार झाला नसता, कधीचे मंदिर बनले असते. हा संघर्ष जेंव्हा सर्वोच्च न्यायालयात गेला तेंव्हा न्यायालयाने निर्णय दिला की हे ठिकाण राम जन्मभूमी आहे. या निकालाच्या आधारावरच ट्रस्ट निर्माण झाला आणि ट्रस्टने त्याच ठिकाणावर मंदिर बनविले आहे. दरम्यान काही व्यक्ती आपल्या अज्ञानाच्या जोरावर अशी चुकीची विधाने आणि पोस्ट करीत असून व्हायरल दावे चुकीचे आहेत.” अशी माहिती दिली.
एकंदरीत, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेक सोशल मीडिया युजर्सनी सीता-राम बिर्ला मंदिराबाबत खोटा दावा केला की ही बाबरी मशीद आहे आणि राम मंदिर त्यापासून ३ किलोमीटर अंतरावर बांधले जात आहे. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडली गेली त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले जात आहे.
आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल दावा खोटा आहे. ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडण्यात आली तेच रामाचे जन्मस्थान असून त्याच ठिकाणी भव्य राम मंदिर उभारण्याचे काम सुरु आहे.
Our Sources
Google Search
Google Map
Google Earth Pro
Conversation with Shri Kameshwar Choupal, Member, Ram Mandir Trust
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
April 12, 2025
Prasad S Prabhu
April 11, 2025
Kushel Madhusoodan
April 8, 2025