Saturday, December 14, 2024
Saturday, December 14, 2024

HomeFact Checkगर्भवती महिलेचा जीव वाचवणाऱ्या चिमुरडीचा हा व्हिडिओ खरा नाही

गर्भवती महिलेचा जीव वाचवणाऱ्या चिमुरडीचा हा व्हिडिओ खरा नाही

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत एका लहान मुलीने गर्भवती महिलेचे प्राण वाचवले असल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक ऑटोरिक्षा रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसत आहे. त्या ऑटोरिक्षात एक गर्भवती महिला बसलेली आहे, ती प्रसूती वेदनांनी तळमळताना दिसते. रिक्षाचालक रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची मदत मागताना दिसतो,पण त्याच्या मदतीला कोणी येत नाही.

काही वेळाने त्या ऑटोरिक्षासमोर एक कार थांबते आणि त्यातून एक छोटी मुलगी खाली उतरते. लहान मुलगी गर्भवती महिलेला पाणी देते आणि त्यानंतर एक व्यक्ती कार खाली उतरतो. वेदनेने तळमळणा-या गर्भवती महिलेला तो व्यक्ती उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. एका लहान मुलीने गर्भवती महिलेचा जीव वाचवल्याचे या व्हिडिओत दिसते.

सोशल मीडियात या लहान मुलीच्या संवेदनशीलतेचे कौतुक करत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

व्हायरल फेसबुक पोस्ट इथे पहा

व्हायरल फेसबुक पोस्ट इथे पहा

वरील व्हिडिओही ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

Fact Check/Verification

‘एका लहान मुलीने गरोदर महिलेचा जीव वाचवला’ या शीर्षकासह व्हायरल झालेल्या व्हिडिओमागील सत्य जाणून घेण्यासाठी, आम्ही invid टूलच्या मदतीने यातील काही कीफ्रेमम रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधल्या. परंतु आम्हाला या व्हिडिओशी संबंधित कोणताही माहिती आढळून आली नाही.

त्यानंतर आम्ही इतर काही कीवर्डसह Google वर शोधू लागलो. या दरम्यान आम्हाला फेसबुकवर 3 मिनिटे 02 सेकंदांचा व्हिडिओ मिळाला. हा तोच व्हिडिओ आहे जो सध्या व्हायरल होत आहे. आम्ही तो पूर्ण पाहिला तेव्हा आम्हाला कळले की हा जनजागृतीच्या उद्देशाने बनवलेला व्हिडिओ आहे.

प्राप्त व्हिडिओमध्ये, 3 मिनिटांनंतर, आम्हाला एक अस्वीकरण लिहिलेले आढळले, ज्यामध्ये असे लिहिले आहे- ‘This reel like video footage is published only for the purpose of educating the public by making them understand how the real world situations will be. During this video making, we have taken real incidents and picturised (them) to educate the public.’

ज्याचा मराठी अनुवाद असा आहे – “हे रील लाईफ व्हिडिओ फुटेज केवळ लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने प्रकाशित केले गेले आहे, त्यांना वास्तविक जगाची परिस्थिती कशी असेल हे समजावे. हा व्हिडीओ बनवताना, आम्ही खर्‍या घटनांचा वेध घेतला आहे आणि लोकांचे प्रबोधन करण्यासाठी तो बनवला आहे.

पण, शेअर होत असलेल्या व्हिडिओतून हा डिस्क्लेमर काढून टाकण्यात आला आहे, त्यामुळे लोक याला खरी घटना मानत आहेत आणि या चिमुरडीने गर्भवती महिलेचा जीव वाचवल्याचा दावा करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.

Conclusion 

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले, ‘एका लहान मुलीने गर्भवती महिलेला वाचवले’ या शीर्षकासह शेअर करण्यात येत असलेला व्हिडिओ जनजागृतीसाठी तयार करण्यात आला आहे. ही घटना खरी नाही.

Result: Misleading

Our Sources

Harjit Rendawa

Self Analysis

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular