Authors
Claim
उत्तराखंडमधील बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवणारी टीम दर्शविणारा फोटो.
हिंदुस्तान टाईम्ससह अनेक प्रकाशनांनी ही प्रतिमा त्यांच्या दिल्ली आवृत्तीवर PTI आणि दैनिक भास्कर यांना त्यांच्या फेसबुक पेजवर श्रेय देऊन प्रकाशित केली आहे.
Fact
काही ठिकाणी प्रतिमा सॉफ्ट झाल्याचे आणि टीमचे चेहरे वर आलेले दिसले, यामुळे आमच्या शंका वाढल्या. आम्ही प्रतिमेचे बारकाईने विश्लेषण केले ज्यामुळे अधिक विसंगती दिसून आली. आमच्या लक्षात आले की जे हात आणि बोटे वर धरून ठेवली होती, ती संरेखित नव्हती आणि अनियमित होती, ज्यामुळे आम्हाला जवळजवळ खात्री झाली की प्रतिमा AI द्वारे तयार केली गेली आहे.
प्रतिमेतील काही पुरुषांचे डोळे स्पष्टपणे परिभाषित नव्हते आणि ते सॉफ्ट फोकसमध्ये होते. आमच्या शंकेची पुष्टी करण्यासाठी, आम्ही Hive AI डिटेक्टरवर प्रतिमा पाहिली, प्रतिमा AI आढळली आहे की नाही हे तपासण्यासाठी एक साधन, ज्याने हे उघड केले की प्रतिमा 99% AI जनरेट झाली आहे, त्यामुळे आमच्या संशयाची पुष्टी मिळाली.
आम्ही प्रतिमेचा स्रोत शोधण्यासाठी reverse image search देखील केला, परंतु त्यात काहीही संबंधित आढळले नाही. त्यानंतर Newschecker ने सोशल मीडियावर कीवर्ड शोध सुरू ठेवला ज्याने आम्हाला अंशुल सक्सेना (@AskAnshul) च्या ट्विटवर नेले, ज्याने बचाव मोहिमेचे एक आर्टवर्क केले आहे. जेव्हा आम्ही कॉमेंट विभाग स्कॅन केला, तेव्हा आमच्या लक्षात आले की युजर्सपैकी एकाने (@TheKhelIndia) ‘एक्सक्लुझिव्ह माइंड्स’चा वॉटरमार्क असलेल्या, व्हायरल चित्राप्रमाणेच दुसर्या प्रतिमेवर कॉमेंट केली होती.
‘Exclusive minds’ चे पृष्ठ पाहिल्यावर, आमच्या लक्षात आले की पृष्ठाने अशा प्रतिमांची मालिका ट्विट केली आहे आणि त्यांनी स्पष्ट केले आहे की प्रतिमा AI generated आहे.
Result: False
Our Sources
Result by Hive AI detector
Tweet by @Exclusicev_Minds, dated November 29, 2023
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम पंकज मेनन यांनी केले असून येथे वाचता येईल)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा