Wednesday, September 27, 2023
Wednesday, September 27, 2023

घरFact CheckFact Check: P-500 पॅरासिटामोल गोळ्यांमध्ये घातक माचुपो व्हायरस असतो का? व्हायरल अलर्टमागील...

Fact Check: P-500 पॅरासिटामोल गोळ्यांमध्ये घातक माचुपो व्हायरस असतो का? व्हायरल अलर्टमागील सत्य हे आहे

Authors

Kushel HM is a mechanical engineer-turned-journalist, who loves all things football, tennis and films. He was with the news desk at the Hindustan Times, Mumbai, before joining Newschecker.

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
P-500 पॅरासिटामॉल गोळ्यांमध्ये माचुपो विषाणू असतो, ज्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

Fact
या व्हायरल संदेशाचे स्वरूप शुद्ध अफवा असेच असून त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

अनेक सोशल मीडिया युजर्स पॅरासिटामॉल टॅब्लेट, विशेषत: P-500 बद्दल एक चेतावणी देणारा संदेश व्हायरल करीत आहेत. हा संदेश कुटुंबातील सदस्यांना प्रामुख्याने सांगा असे आवाहन केले जात आहे. व्हायरल फॉरवर्डच्या मते, “नवीन, अतिशय पांढर्‍या आणि चमकदार” टॅब्लेटमध्ये “माचुपो व्हायरस” असतो ज्याचा मृत्यू दर जास्त असतो.

Fact Check: P-500 पॅरासिटामोल गोळ्यांमध्ये घातक माचुपो व्हायरस असतो का? व्हायरल अलर्टमागील सत्य हे आहे

आम्हाला आमच्या Whatsapp टिपलाइनवर (9999499044) हा दावा प्राप्त झाला असून, त्याची तथ्य तपासणी करण्याची विनंती केली आहे.

Fact Check: P-500 पॅरासिटामोल गोळ्यांमध्ये घातक माचुपो व्हायरस असतो का? व्हायरल अलर्टमागील सत्य हे आहे

Fact check

न्यूजचेकरने प्रथम “पॅरासिटामोल माचुपो व्हायरस” साठी कीवर्ड शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला 2 ऑगस्ट 2017 रोजी सिंगापूर सरकारच्या या संदेशाकडे नेले, पॅरासिटामोल P-500 टॅब्लेटमध्ये मॅचुपो व्हायरस आढळल्याचा दावा करणारा संदेश “फसवणूक” आणि अफवा असून हा इशारा “चुकीचा” आहे. आणि चिंतेचे कारण नाही.” असे त्यामध्ये लिहिलेले आढळले.

Fact Check: P-500 पॅरासिटामोल गोळ्यांमध्ये घातक माचुपो व्हायरस असतो का? व्हायरल अलर्टमागील सत्य हे आहे

यातील सल्ल्यानुसार, माचुपो व्हायरस किंवा बोलिव्हियन हेमोरेजिक फिव्हर (BHF) व्हायरसमुळे ताप, स्नायू दुखणे, हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव होणे आणि फेफरे येणे यासारखी लक्षणे दिसतात. माचुपो विषाणूचा संसर्ग विषाणूच्या थेट संपर्कामुळे होतो, जो प्रामुख्याने संक्रमित उंदीरांच्या लाळ, विष्ठा आणि मूत्राद्वारे प्रसारित होतो. आजपर्यंत, माचुपो व्हायरसचे संक्रमण फक्त दक्षिण अमेरिकेतच नोंदवले गेले आहे.

4 नोव्हेंबर 2020 रोजी थायलंड-येथील द नेशनने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्था आणि समाज मंत्रालयाने देखील हा इशारा चुकीचा असल्याचे सिद्ध केले आहे. “शिवाय, माचुपो विषाणू कोरड्या जागी विकसित होऊ शकत नाही, त्यामुळे टॅब्लेट संक्रमित होण्याची शक्यता खूपच कमी आहे,” असे वृत्तात म्हटले आहे.

आम्ही AIIMS, दिल्ली येथील वरिष्ठ निवासी डॉक्टर डॉ. दिपिन सुधाकरन यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी पुष्टी केली की व्हायरल अलर्ट फसवा आहे आणि त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. “व्हायरसला जगण्यासाठी शरीराची अर्थात यजमानाची गरज असते. यजमानांशिवाय, ते पॅरासिटामॉल टॅब्लेटसारख्या निर्जीव वस्तूमध्ये जास्त काळ टिकत नाही. ही लबाडी अर्थात अफवा काही काळापासून फिरत आहे.”

Conclusion

आमच्या तपासात पॅरासिटामॉल (P-500) टॅब्लेटमध्ये घातक माचुपो विषाणू असल्याबद्दल व्हायरल अलर्ट आणि त्यामधील चेतावणी खोटी असल्याचे आढळले.

Result: False

Sources
Singapore government advisory, August 2, 2017
The Nation report, November 4, 2020
Conversation with Dr Dipin Sudhakaran

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Kushel HM is a mechanical engineer-turned-journalist, who loves all things football, tennis and films. He was with the news desk at the Hindustan Times, Mumbai, before joining Newschecker.

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular