Wednesday, November 6, 2024
Wednesday, November 6, 2024

HomeFact CheckCrimeकेरळ मध्ये हिंदू मुलींनी मुस्लिमाला मारले? चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल होतोय व्हिडीओ

केरळ मध्ये हिंदू मुलींनी मुस्लिमाला मारले? चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल होतोय व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये मुली आणि महिलांचा समूह एक ते दोन व्यक्तींना मारताना दिसतात. या व्हिडीओ सोबत अर्धी इंग्रजी आणि अर्धी हिंदी कॅप्शनही शेयर केली जात आहे. “In Kerala Hindu girls attacked a Muslim man for his misbehaviour ऐसा ही जिहादी👌👍💪🇮🇳🚩 लोगों को सबक सिखाओ.” “केरळ मध्ये हिंदू मुलींनी मुस्लिमावर त्याच्या गैरवर्तनामुळे हल्ला केला. असा ही जिहादी. या लोकांना धडा शिकवा.” असे ही कॅप्शन सांगते.

केरळ मध्ये मुस्लिम व्यक्तीला त्याच्या गैरवर्तनाबद्दल हिंदू मुलींनी मारहाण करून धडा शिकवला.
Screengrab of Whatsapp viral message

हा व्हिडीओ आपल्याला पाहता येईल.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check/ Verification

आम्ही Invid टूलच्या मदतीने इमेजमधील व्हिडिओ कीफ्रेम बाजूला केला. त्यानंतर रिव्हर्स इमेज शोध घेण्यात आला. आम्हाला रिपोर्टर चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेली एक बातमी मिळाली. विशेष म्हणजे या व्हिडिओची एक मुख्य फ्रेम वेबसाइटवर बातमीत देण्यात आली आहे. केरळ येथे घडलेल्या या घटनेबद्दल 6 जानेवारी 2023 ची बातमी अशी आहे: “इरिंगलाकुडा मुरियाद ध्यान केंद्रासमोर दगडफेक प्रकरणात 11 महिलांना कोठडीत ठेवण्यात आले आहे. हा संघर्ष आस्तिक आणि चर्च मध्ये येणे सोडलेल्या दोन गटांमध्ये झाला होता. कारमधून प्रवास करणाऱ्या कुटुंबाला मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली असल्याने ही कारवाई झाली. मुरियाड पठारावर शाजी आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणी चालकुडी न्यायालयाने आरोपींना कोठडी सुनावली होती. इरिंगलाकुडा मुरियाद सम्राट इमॅन्युएल चर्चच्या महिला श्रद्धाळुंनी चर्चचे नाते सोडलेल्या कुटुंबाशी भांडण केले होते. याचे पर्यवसान मारहाणीत होऊन दोन्ही पक्ष जखमी झाले. आलूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही सामूहिक प्रार्थनास्थळाची इमारत मुरियाडच्या कपारकडव भागात होती. मुरियाद सम्राट इमॅन्युएल चर्चच्या झिऑन ध्यान केंद्रातून बाहेर पडलेल्या कुटुंबाला महिलांनी त्यांच्या कारमध्ये येताच थांबवले. मूळ मुरियाड येथील रहिवासी असलेल्या शाजी व त्यांचे कुटुंबीय गाडीत होते. शाजीला गाडीतून ओढून मारहाण करण्यात आली.”

केरळ मध्ये मुस्लिम व्यक्तीला त्याच्या गैरवर्तनाबद्दल हिंदू मुलींनी मारहाण करून धडा शिकवला.
Screen grab of reporter TV

बातमी पुढे म्हणते: ”प्रतिमा मॉर्फ करून प्रसारित केल्या गेल्या हेच हल्ल्याचे प्रमुख कारण असल्याचे मारहाणकर्त्या महिलांनीही स्पष्ट केले आहे. सुमारे पन्नास जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे शाजी यांचे म्हणणे आहे. दोन्ही गटांनी रुग्णालयात उपचार घेतले. या संघर्षाबद्दल आलूर पोलिसांचा तपास सुरू आहे. चर्चला जाणे सोडणारे आणि विश्वास ठेवणारे यांच्यात मतभेद झाले आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्रिशूर ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

पीडित मुस्लिम आहे आणि मारहाण करणारे हिंदू आहेत याचा उल्लेख कुठेही बातमीत आढळला नाही.

‘ध्यान केंद्रावर जमावाने मारहाण; 6 जानेवारी 2023 रोजी एशियानेट न्यूज वेबसाइटवर प्रकाशित झालेली ‘इलेव्हन वुमन ऑन रिमांड’ नावाची समान फोटो असलेली बातमीही आम्हाला पाहायला मिळाली.

“शाजी, त्याचा मुलगा साजन, त्याची पत्नी अश्लिन, नातेवाईक एडविन, अनविन आणि इतरांना मुरियाड पठारावर कारमधून जाताना बेदम मारहाण करण्यात आली. शाजीचे कुटुंब अधार्मिक आहे. कारमधून प्रवास करणाऱ्या साजनला महिलांच्या गटाने अडवले. तेथील एका महिलेचे मॉर्फ केलेले नग्न छायाचित्र प्रसारित केल्याचा आरोप महिलांच्या गटाने केला आहे,” असे बातमीत म्हटले आहे. शिवाय, मारहाण झालेल्या व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांचा मुस्लिम धर्माशी तसेच राजकीय संबंध असल्याचे कोणतेही उल्लेख नाहीत.

केरळ मध्ये मुस्लिम व्यक्तीला त्याच्या गैरवर्तनाबद्दल हिंदू मुलींनी मारहाण करून धडा शिकवला.
Screen grab of Asianet News’ report

कैराली टीव्हीने 6 जानेवारी 2023 रोजी आपल्या यूट्यूब चॅनेलवर अशाच वर्णनासह व्हिडिओ प्रकाशित केला आहे.

ही घटना अलूर स्टेशन हद्दीत घडल्याने आम्ही पोलिस ठाण्यात फोन केला. अलूर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणात, गुन्हेगार किंवा हिंसाचार पीडित दोघांचाही राजकीय संबंध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले नाही.”

“आम्हाला मॉर्फ केलेल्या प्रतिमा प्रसारित केल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे आणि तपास सुरू आहे. त्या प्रतिमा परदेशी आयपी अड्रेसवरून अपलोड केल्या आहेत. “हल्‍ला झालेल्‍या व्‍यक्‍तीचा यामध्ये सहभाग होता का याचा पोलिस तपास करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

सम्राट इमॅन्युएल चर्चमधील जनसंपर्क प्रभारी डॉ. एडिसन यांच्याशी संपर्क साधला असता, ”चर्चमधून बाहेर पडल्यानंतर शाजी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध मार्गांनी श्रद्धावानांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. “शाजीने मंडळीतील अनेकांना आदर असलेल्या महिलेची छायाचित्रे मॉर्फ करून प्रसारित केली आहेत, ज्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले आहे.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात हिंदू मुलींनी मुस्लिमांना मारहाण केल्याचा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले आहे. ही मारहाण चर्च च्या वादातून आणि फोटो मॉर्फिंग च्या आरोपातून श्रद्धाळू आणि चर्च सोडलेल्या ख्रिश्चनांच्या दोन गटात झाली आहे. चुकीचा संदर्भ देऊन हा व्हिडीओ शेयर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: Partly False

Sources


News report in 
Reporter TV website on January 6,2023


News report in 
Asainet news wesite on January 6,2023


Youtbe video of 
Kairali TV on January 6,2023


Telephone conversation with Aloor police


Telephone conversation with Dr Edison of Emperor Immanuel Church

Inputs by Sabloo Thomas


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular