Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
केपटाऊन हे जगातील पहिलं पाणीविरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे.
Fact
असा संदेश अनेक वर्षांपासून पसरत असून २०१८ मध्ये झालेल्या पाणीटंचाईचा चुकीचा अर्थ पसरविला जात आहे.
अखेर नियतीने आपला फास आवळला आहे. दक्षिण आफ्रिका या देशातील प्रमुख शहर केप टाऊन हे शहर जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे. यामुळेच आता पाणी जपून वापरा. असा संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. उन्हाळ्याच्या झाला बसत असताना पाणी बचतीचा संदेश देताना पाठविला जाणारा हा संदेश अनेकजण पुढे पाठवीत आहेत.

फेसबुकवर हजारो युजर्सनी हा संदेश पोस्ट केला आहे. याचबरोबरीने अनेकजण व्हाट्सअप च्या माध्यमातून हा संदेश पुढे पाठवीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

“ऩियतीने अखेर फास आवळला दक्षिण अफ्रिका या देशातील मुख्य शहर केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने १४ एप्रिल २०२3 नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली होती. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल.पाणी जपून वापरा. पाण्याची नासाडी थांबवा. आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी पाठवलं होतं. *जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे. ग्रुप मेंबरना आवाहन !! जवळच्या सर्वच धरणातील पाणी कमी झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी खोलवर गेली आहे.तेव्हा आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:- 1. रोज गाड्या धुवू नका. 2. अंगणात पाणी मारू नका. 3.. सतत नळ चालू ठेऊ नका. 4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया. ५) घरातील गळके नळ रिपेअर करा ६) सोसायटीतील गळकी टाकी , पाईप,बॉल कॉक रिपेअर करा. ७) झाडे लावा झाडे जगवा. ८) झाडाच्या कुंडीत पाणी जपून घाला या संकटाचा एकत्र सामना करूया. -वरील संदेश ५ ग्रुप मध्ये पाठवा..जादु वैगेरे काही होणार नाही, पण नक्कीच महत्वाची बातमी पसरवल्याचे समाधान मिळेल आणि येणाऱ्या दुष्काळात पाणी बचतीचे पुण्य घडेल, चार तहानलेल्यांची तहान भागेल. पुढच्या पिढीला पाणी मिळेल. झाडे लावा झाडे जगवा एक सामाजिक चळवळ” असे हा मेसेज सांगतो.
संपूर्ण मेसेज वाचल्यावर हा मेसेज उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून जागृती करण्यासाठी तयार करण्यात आला असल्याचे आमच्या लक्षात आले. दरम्यान या मेसेज मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन या शहराबद्दल लिहिण्यात आलेली माहिती आम्हाला संशयास्पद वाटली. आम्ही किवर्ड सर्च च्या माध्यमातून याबद्दल गुगल वर शोध घेतला. आम्हाला लोकसत्ता ने ४ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेला एक लेख वाचायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेत २०१८ मध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवल्याने १२ एप्रिल पर्यंत पाणीसाठा संपण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान सरकारने दररोज २५ लिटर पाणी सार्वजनिक नळावरून घेऊन जाण्याची सूचना केली होती. अशी माहिती आम्हाला या लेखातून मिळाली.

भविष्यात होणारे धोके ओळखून २०१८ मध्ये ही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र पाणी विरहित शहर असे घोषित करण्यात आले आहे. याला कोणताही पुरावा सापडला नाही.
याचदरम्यान आम्हाला केपटाऊन येथे राबविण्यात आलेल्या ‘झिरो डे’ या संकल्पनेबद्दलही माहिती मिळाली. त्याबद्दल आम्ही अधिक शोध घेतला. आम्हाला globalresilience या विद्यापीठाने केलेला अभ्यास निबंध वाचायला मिळाला. केपटाऊन हे शहर धरणांच्या पाण्यावर अवलंबून आहे. पाऊस कमी झाल्याने या शहराला जानेवारी २०१८ मध्ये पाणीसमस्येची कुणकुण लागली होती. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी २०१८ च्या १४ एप्रिल पासून काही दिवस शून्य पाण्याचे असे जाहीर करण्यात आले होते. मात्र योग्य नियोजनामुळे पाणी पुरले व झिरो डे पाळावा लागला नाही. असे या लेखात आम्हाला वाचायला मिळाले.

सध्या म्हणजेच २०२३ मध्ये केपटाउन मधील पाण्याची स्थिती कशी आहे? हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला असता, आम्हाला brookings.edu ने २२ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेला एक शोध निबंध सापडलं. २०१५ ते २०१८ दरम्यान पाणी टंचाई सोसलेल्या केपटाऊन ने आता योग्य नियोजन करून पाण्याच्या संदर्भात कशी स्थिती सुधारली आहे, हे या लेखात लिहिले आहे.

यावरून केपटाऊन येथे पाणी टंचाई होती मात्र त्यामध्ये आता योग्य नियोजन करून सुधारणा करण्यात आल्याचे दिसून आले. १४ एप्रिल २०२३ पासून पाणीपुरवठा करण्यास तेथील प्रशासनाने असमर्थता दाखविली असल्याचे दर्शविणारी कोणतीही माहिती आम्हाला उपलब्ध झाली नाही.
आमच्या तपासात दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहर पाणीविरहित म्हणून जाहीर करण्यात आले असून १४ एप्रिल २०२३ पासून तेथे पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. असा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरात सर्वत्र पाणी टंचाई आहे. दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा हे आवाहन न्यूजचेकर टीम तर्फे आम्हीही करीत आहोत.
Our Sources
Article published by Loksatta on March 4, 2018
Article published by globalresilience
Article published by brookings.edu on March 22, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in