शरद पवारांना थप्पड लगावल्याचा व्हिडिओ सध्याचा असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हिंदीतील पोस्टचा आम्ही अनुवाद केला. यात म्हटले आहे की, खलिफा विरोधात बोलणा-या सचिन तेंडुलकरला सल्ला देणारे शरद पवार यांना कुणीतरी थप्पड लगावली, पवार देखील आता केजरीवाल यांच्या रेसमध्ये आले.
शेतकरी आंदोलनावरुन सचिन तेंडुलकरने टविट केल्यानंतर माजी कृषीमंत्री व एनसीपी प्रमुख शरद पवारांनी आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील असे म्हटले होते. यानंतर पवारांना थप्पड लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Fact Check / Verification
सचिन तेंडूलकरला शेतकरी आंदोलनावरुन सल्ला दिल्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आणि माजी कृषीमंत्री शरद पवार याना कुणीतरी थप्पड लगावली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगलमध्ये काही किवर्ड्सचा साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला सध्याची अशी बातमी आढळून आली नाही.
गूगल रिव्हर्स इमेजच काही किवर्डसच्या साह्याने शोध घेतला असता एनडीटीव्हीच्या 10 वर्षांपूर्वीच्या बातमीचा एक व्हिडिओ आढळून आला जो सध्याच्या व्हायरल व्हिडिओशी मिळता जुळता आहे.
शरद पवार हे युपीएच्या काळात केंद्रीय कृषिमंत्री होते त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. 24 नोव्हेंबर 2011 रोजीच्या बातमीत म्हटले आहे की, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना नवी दिल्ली महानगरपालिका (एनडीएमसी) केंद्रात एका तरुणाने थप्पड लगावली. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतल्यावर ते बाहेर जात असताना मंत्र्यांवर हल्ला झाला. वाढत्या महागाईवर सरकारचे नियंत्रण नसल्याच्या रागातून की कृती केल्याचे हरविंदरसिंग नावाच्या तरुणाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
शरद पवारांना थप्पड लगावणा-या हरविंदरसिंगला आठ वर्षानंतर 2019 मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली. याबात आम्हाला लोकमतची बातमी आढळून आली.

याशिवाय आम्हाला एनडीटीव्हीची बातमी देखील आढळून ज्यात हरविंदरसिंगला अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Conclusion
यावरुन हे स्पष्ट होते की, शरद पवारांना थप्पड लगावल्याचा व्हिडिओ 10 वर्षांपूर्वीचा आहे, तो सध्याचा असल्याचा चुकीचा दावा व्हायरल जाला आहे.
Result- Misleading
Our Sources
एनडीटिव्ही- https://www.youtube.com/watch?v=B9_RYzkbta8
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.