Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralतो फोटो अटल बोगद्याचा नाही, जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

तो फोटो अटल बोगद्याचा नाही, जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच उद्घाटन केलेल्या अटल बोगद्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. पोस्टमधील दाव्यानुसार हा फोटो अटल बोगद्याचा असून जगातील सर्वात लांब 9.02 किमी बोगदा असल्याचे म्हटले आहे. यामुळे मनाली ते लेह मधील अंतर 46 किलोमीटरने कमी होणार आहे.

https://www.facebook.com/photo?fbid=2965439247016732

संग्रहित

याशिवा तरुण भारतच्या फेसबुक पेजवरील बातमीत देखील हा फोटो आढळून आला.

https://www.facebook.com/MahaMTB/posts/3762883917067027

संग्रहित

तरुण भारतच्या फेसबुक पेजवर देखील हाच फोटो अटल बोगद्याचा म्हणून शेअर करण्यात आला आहे.

https://www.facebook.com/MahaMTB/posts/3762883917067027

संग्रहित

हाच दावा करणारे एक ट्विट देखील आढळून आले.

https://twitter.com/SAILsteel/status/1312067588491374592

Fact Check / Verification

व्हायरल होत असलेला फोटो अटल बोगद्याचाच आहे का याची आम्ही पडताळणी सुरु केली. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा फोटो कॅलिफोर्नियातील डेविल्ड स्लाईट टनेलचा असल्याचे म्हटले आहे. हे सॅन फ्रान्सिस्कोच्या दक्षिणेस 15 मैलांच्या दक्षिणेस आहे, आणि कॅलिफोर्नियाच्या आखाती प्रदेशात पॅसिफिक आणि माँटाराच्या दरम्यान आहे. या बोगद्याचे काम सुरु असताना 2012 मध्ये एका ब्लाॅगमध्ये याचे फोटो शेअर करण्यात आले असल्याचे आढळून आले.

या बोगद्याचे उद्घाटन 2013 मध्ये झाले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ देखील यूट्यूबवर आढळून आला.

https://www.youtube.com/watch?v=6YSy40BSwsU

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी अटल बोगद्याचे शेअर केले आहेत. यावरुन जिथे बोगद्याच्या प्रवेशद्वाराचा आकार लक्षात येईल.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, कॅलिफोर्नियामधील बोगद्याचा फोटो अटल बोगद्याचा म्हणून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यावरुन हेच सिद्ध होते की, सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Result: Misleading

Our Sources

cruiserclothing- https://www.cruiserclothing.com/blog/inside-the-devils-slide-tunnel

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular