या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. अभिनेत्री दीपिका पादुकोणचा शेतक-यांचे समर्थन करणारा टीशर्ट घातलेला फोटो व्हायरल झाला तर उत्तरप्रदेशमधील हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडितेचा म्हणून दुस-याच मृत युवतीचा फोटो व्हायरल झाला, हे सगळे दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.

अभिनेत्री दीपिका पादुकोणने फार्मरबिल विरोधात शेतक-यांचे समर्थन केल्याचा दावा
दीपिकाचा एक फोटो व्हायरल झाला आहे यात तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून त्यावर इंग्रजीत I_Stand_with_Indian_Farmers ( मी भारतीय शेतक-यांच्या बाजूने आहे) हे घोषवाक्य लिहिल्याचे दिसत आहे. पडताळणीत हा फोटो एडिट केल्याचे आढळले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

कोरोनाच्या संकटामुळे सरकारी अधिका-याला रडू कोसळले असल्याचा दावा
दावा करण्यात येत आहे की, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख श्री. ओमप्रकाश शेटे पत्रकारांशी बोलतांना रडले. पडताळणीत ओमप्रकाश शेटे हे भाजपाच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख होते, सध्या ठाकरे सरकारच्या काळात ते कोणत्याही सरकारी पदावर कार्यरत नाहीत हे सत्य समोर आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

व्हायरल व्हिडिओ भावगर- भरुच क्रुझसेवेचा असल्याचा दावा
गुजरातमधील भावनगर ते भरुच रोड हे अंतर 350 किलोमीटर आहे, आणि समुद्री मार्गाने ते 32 किलोमीटर आहे आता या समुद्री मार्गाने जहाज सेवा सुरू करण्यात आली आहे आणि क्रुझ अवघ्या अर्ध्या तासात हे अंतर पार करणार असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पडताळणी हा दावा असत्य असल्याचे आढळून आले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल फोटो हाथरस प्रकरणातील पिडितेचा असल्याचा दावा
एका युवतीचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दावा करण्यात फोटो दिसणारी मुलगी ही हाथरस बलात्कार प्रकरणातील पीडिता आहे. हा फोटो अयोध्येतील युवतीचा असून एक वर्षांपूर्वी चदिगडमधील हाॅस्पिटलमध्ये तिचे निधन झाले होते. डॉक्टरांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी तिच्या फोटोसह एक मोहीम चालविली होती. परंतु, आता तो फोटो हाथरस प्रकरणाशी जोडून शेयर केला जात आहे हे पडताळणीत सत्य समोर आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

योगी आदित्यनाथ यांनी हाथरस पिडितेचे अंत्यसंस्कार लाईव्ह पाहिल्याचा दावा
एक फोटो व्हायरल होत आहे. यात योगी आदित्यनाथ लॅपटाॅपवर चिता जळताना पाहत असल्याचे दिसते. पोस्टमध्ये म्हटले आहे की, हाथरस पिडितेला युपी पोलिसांनी कसे जिंवत जाळले त्याचा लाईव व्हिडिओ पाहताना एक नाकाम मुख्यमंत्री. मात्र हा फोटो एडिट केल्याचे सत्य पडताळणीत समोर आले. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.