Monday, May 29, 2023
Monday, May 29, 2023

घरFact CheckViralमहात्मा गांधी यांच्या मूर्तीवर बसलेल्या व्यक्तीचा फोटो राजस्थानचा आहे? जाणून घ्या सत्य...

महात्मा गांधी यांच्या मूर्तीवर बसलेल्या व्यक्तीचा फोटो राजस्थानचा आहे? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती महात्मा गांधी यांच्या मूर्तीवर बसतांना दिसत आहे. त्यात दावा केलाय की, हा फोटो राजस्थानचा आहे आणि बसलेली व्यक्ती मुस्लिम आहे.

काही लोक असाही दावा करत आहे की, जर गांधीजी यांचा अपमान हिंदूने केला असता तर त्या समुदायाच्या लोकांनी आतापर्यंत गोंधळ केला असता. हा दावा ट्विटर आणि फेसबुकवर खूप व्हायरल झाला आहे.

फोटो साभार : Twitter@024579768Bansal

मागच्या महिन्यात राजस्थानमध्ये दोन धार्मिक हिंसेच्या घटना घडल्या होत्या. २ एप्रिलला हिंदू नववर्षाच्या निमित्ताने करौलीमध्ये धार्मिक हिंसा पाहायला मिळाली. नुकतेच जोधपूरमध्ये दोन समुदायातील लोक एकमेकांसमोर आले होते. 

त्यातच आता सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत असून त्यात राजस्थानातील एक मुस्लिम व्यक्ती महात्मा गांधी यांच्या मूर्तीवर एक व्यक्ती बसतांना दिसत आहे.

Fact Check/Verification

महात्मा गांधी यांच्या फोटोची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर शोधले. पण या संदर्भात आम्हांला कोणतीही बातमी आढळली नाही. 

पण हा फोटो यांडेक्सवर रिव्हर्स सर्च केल्यावर आम्हांला ३ ऑक्टोबर २०१७ ची एक ट्विटर पोस्ट मिळाली. त्या पोस्टमध्ये व्हायरल फोटो दिसत आहे. जी उत्तर प्रदेश अमेठीची सांगितली जात आहे. त्यात हे देखील लिहिलंय की, गांधीजी यांच्या मूर्तीवर बसलेला व्यक्ती भाजपचा समर्थक आहे.

फोटो साभार : Twitter@PratigyaMishra4

त्यानंतर काही कीवर्डच्या मदतीने शोधल्यावर आम्हांला फेसबुकवर २-३ ऑक्टोबर २०१७ रोजीच्या काही पोस्ट मिळाल्या. तिथे हा फोटो अमेठीचा सांगितला जात आहे. त्यावेळी लोकांनी लिहिले होते की, अमेठीमधील गांधी चौकात भारत मिलाप कार्यक्रमादरम्यान हा फोटो काढण्यात आला होता. 

फोटो साभार : Facebook/rahulyadav.faizabad.50

हा फोटो अमेठीतील गांधी चौकातील आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेले काही फोटो आणि व्हिडिओ शोधण्यास सुरवात केली. रोड ऑन नावाच्या एका युट्यूब वाहिनीवर मार्च २०२० मध्ये अमेठी शहराच्या रस्त्यावरील एक व्हिडिओ पोस्ट केली होती. या व्हिडिओत जवळपास ८ मिनिटे अमेठी भागाचे शूट केले आहे.

या व्हिडिओत ४ मिनिटे १७ सेकंदावर अमेठीमधील गांधी चौक दिसत आहे. जिथे व्हायरल फोटोतील गांधीजी यांची मूर्ती दिसत आहे. त्या ठिकाणी दिसणारा भाग व्हायरल फोटोशी जुळवून पाहिल्यावर समजते की, हा फोटो अमेठीतील गांधी चौकातलाच आहे. 

फोटो साभार : YouTube Channel/Road ON

या व्यतिरिक्त अमेठीमधील गांधीजी यांच्या काही मूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ आम्हांला मिळाले. त्यावरून हे स्पष्ट होते की, हा फोटो अमेठीमधलाच आहे. 

काही स्थानिक पत्रकारांनी देखील आम्हांला सांगितले की, हा व्हायरल फोटो अमेठीमधील गांधी चौकातील आहे. पण आमच्या पडताळणीत हे समजू शकले नाही की, गांधीजी यांच्या मूर्तीवर बसलेला व्यक्ती कोण आहे. 

आम्ही या गोष्टीची पुष्टी करत नाही की, हा व्यक्ती भाजपचा समर्थक आहे. जर त्या व्यक्तीविषयी आम्हांला अधिक माहिती मिळाली तर आम्ही लेख अपडेट करू. 

Conclusion 

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, गांधीजी यांच्या मूर्तीवर बसलेला व्यक्ती राजस्थानचा नाही तर उत्तर प्रदेशातील आहे. हा फोटो जवळपास पाच वर्षांपूर्वीचा आहे. राजस्थानमध्ये होणाऱ्या धार्मिक तणावादरम्यान हे फोटो चुकीच्या दाव्यासोबत व्हायरल होत आहे.

Result : False Context/False

Our Sources

ऑक्टोबर २०१७ च्या फेसबुक आणि ट्विटर पोस्ट

मार्च २०२० मध्ये रोड ऑनने अपलोड केलेला युट्यूब व्हिडिओ

स्वतः केलेले विश्लेषण

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular