पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. पण तो भ्रामक ठरला. महाराष्ट्र पोलीस यांच्या नावाने सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झाला. पण हा देखील दावा आमच्या पडताळणीत भ्रामक ठरला. या आठवड्यात न्यूजचेकरने काही दाव्यांची पडताळणी केली आहे. त्याचा संक्षिप्त अहवाल तुम्ही इथे वाचू शकता.

पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्थानकावर तोडफोड करणाऱ्या तरुणांचा जुना व्हिडिओ व्हायरल
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या रेल्वेच्या आवाजाने नमाज वाचायला अडचण आल्याने मुस्लिम लोकांनी रेल्वे स्थानकाची तोडफोड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील खरंच हे फोटो आहेत? जाणून घ्या सत्य काय आहे
चार फोटो एकत्र करून ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील आहे, असे शेअर केले जात होते. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

महात्मा गांधी यांच्या मूर्तीवर बसलेल्या व्यक्तीचा फोटो राजस्थानचा आहे? जाणून घ्या सत्य काय आहे
महात्मा गांधी यांच्या मूर्तीवर एक व्यक्ती बसतांना दिसत आहे. तो मुस्लिम आहे आणि हा फोटो राजस्थानचा आहे, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

व्हायरल होणारा संदेश खरंच महाराष्ट्र पोलीस यांनी लिहिलाय ? जाणून घ्या सत्य काय आहे
महाराष्ट्र पोलीस यांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला. आम्ही त्याची पडताळणी केली पण तो संदेश भ्रामक ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.