Saturday, November 2, 2024
Saturday, November 2, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap : या आठवड्यात 'ऊधु पवई' या औषधी झाडापासून ते कतार...

Weekly Wrap : या आठवड्यात ‘ऊधु पवई’ या औषधी झाडापासून ते कतार एअरवेजचा परवाना रद्द होण्यापर्यंतच्या मुख्य दाव्यांची पडताळणी

‘ऊधु पवई’ हे औषधी झाड तामिळनाडूतील आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या मुत्सद्देगिरीने कतार एअरवेजचा परवाना रद्द झाला, असा दावा केला जात होता. पण हे दोन्ही देखील दावे आमच्या पडताळणीत भ्रामक ठरले. न्यूजचेकरने या आठवड्यात अशा काही मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी केली आहे. तुम्ही ते संक्षिप्तपणे इथे वाचू शकता. 

‘ऊधु पवई’ हे औषधी झाड खरंच तामिळनाडूतील आहे? याचे सत्य जाणून घ्या 

‘ऊधु पवई’ हे औषधी झाड तामिळनाडूतील आहे, हा दावा केला जात होता. पण हा दावा चुकीचा ठरला. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

व्हायरल झालेली व्हिडिओ नुकत्याच झालेल्या कानपूरमधील धार्मिक विवादाचा आहे? याचे सत्य जाणून घ्या 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाली. नुकत्याच झालेल्या कानपूरमधील धार्मिक विविदाचा असल्याचा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

व्हायरल व्हिडिओ पैगंबर मोहम्मद यांच्यावर नुकत्याच केलेल्या टिप्पणीच्या संबंधित आहे? याचे सत्य जाणून घ्या 

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. हा व्हिडिओ पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी केलेल्या टिप्पणीच्या संबंधित आहे, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानासंबंधित सौदी अरेबियातील लोक खरंच एकत्र आले? अडीच वर्षांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे 

पैगंबर मोहम्मद यांच्या अपमानासंबंधित सौदी अरेबियातील लोक एकत्र आले, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता.

पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्देगिरीने खरंच कतार एअरवेजचा परवाना रद्द झालाय? याचे सत्य जाणून घ्या 

एका बातमीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. पंतप्रधान मोदी यांच्या मुत्सद्देगिरीने कतार एअरवेजचा परवाना रद्द झालाय, असा दावा केला जात होता. याची तथ्य पडताळणी तुम्ही इथे वाचू शकता. 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular