Tuesday, December 24, 2024
Tuesday, December 24, 2024

HomeFact CheckHealth and Wellnessपिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे भारतीय लोक २०२५ पर्यंत खरंच कॅन्सरग्रस्त होतील? याचे सत्य...

पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे भारतीय लोक २०२५ पर्यंत खरंच कॅन्सरग्रस्त होतील? याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एबीसी प्लस न्यूज मराठीचा एक फोटो खूपच जास्त व्हायरल झाला. त्यात असा दावा केलाय की पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सरग्रस्त होतील, असं डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

फेसबुकवर ही पोस्ट खूपच व्हायरल झाली आहे. त्याचा स्क्रिनशॉट खाली जोडत आहे. 

फोटो साभार : Facebook Photo Search

काही महिन्यांपूर्वी अमूलने दुधाच्या दरात वाढ केली, त्यानंतर पराग मिल्क फूड्स या कंपनीने गोवर्धन दुधाच्या दरात वाढ केली. त्यातच आता पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सरग्रस्त होतील, असं डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. असा दावा केला जात आहे.

Fact Check / Verification

डब्ल्यूएचओने पिशवीतील भेसळयुक्त दूधाबाबत सर्वेक्षण केलंय की नाही, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘अडल्ट्रेशन ऑफ मिल्क डब्ल्यूएचओ रिपोर्ट’ असं गुगलवर टाकलं.

फोटो साभार : Google Search Result

त्यावेळी आम्हांला डब्ल्यूएचओने दिलेले एक स्पष्टीकरण मिळाले. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की,”माध्यमांच्या काही अहवालासंदर्भात डब्ल्यूएचओ हे सांगू इच्छितो की, दूध/दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीबाबत आम्ही भारत सरकारला कोणताही सल्ला दिलेला नाही.”

फोटो साभार : WHO

त्याचबरोबर आम्हांला इंडियन एनव्हायरनमेंट पोर्टलवर एक पीडीएफ मिळाली. त्यात लोकसभेचे सदस्य संजय सदाशिवराव मंडलिक यांनी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी ८७ टक्के भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सरने ग्रस्त होतील, असं डब्ल्यूएचओच्या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे, असा प्रश्न विचारला होता. 

फोटो साभार : Indian Environment Portal

त्या प्रश्नावर भारताचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे त्यावेळीचे तत्कालीन मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी उत्तर दिले की, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारताला असा कोणताही सल्ला दिलेला नाही. एफएसएसएआयने भारतातील डब्ल्यूएचओ ऑफिसशी संपर्क साधून हे निश्चित केले आहे. 

फोटो साभार : Indian Environment Portal

या व्यतिरिक्त आम्हांला द न्यू इंडियन एक्सप्रेसची १३ नोव्हेंबर २०१८ ची एक बातमी मिळाली. त्यात एफएसएसएआयचे सीईओ पवन अग्रवाल यांनी सांगितले की,”दुधाचे सेवन केल्यामुळे भारतीयांना गंभीर आजार होण्याचा एक खोटा अहवाल फिरत आहे. पण त्याला कोणताही पुरावा नाही.”

फोटो साभार : The New Indian Express

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, पिशवीतील भेसळयुक्त दूधाच्या संदर्भात डब्ल्यूएचओने कुठलेही सर्वेक्षण केलेले नाही आणि याबाबाबत त्यांनी भारताला कोणताही सल्ला दिलेला नाही.

Result : Fabricated Content/False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular