Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
Claim
फ्रेंच निमलष्करी दलातील महिलांनी मेट्रो अंडरपासमध्ये छळ करणाऱ्या पुरुषांच्या गटाला मारहाण केली.
Fact
व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे आणि व्हिडिओमध्ये दिसणारे महिला आणि पुरुष व्यावसायिक स्टंट आर्टिस्ट आहेत.
भुयारी मार्गात तीन महिला पुरुषांच्या गटावर ठोसे मारत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करणारे दावा करीत आहेत की, सदर महिला ‘फ्रेंच निमलष्करी दलाच्या’ आहेत आणि त्यांना त्रास देणारे उत्तर आफ्रिकन स्थलांतरित आहेत. महिलांचा सामूहिक लैंगिक छळ, अरबी भाषेत ज्याला ‘तहररुश’ म्हटले जाते, करण्याचा प्रयत्न करत आहेत.
@meantweeting1 युजरने X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये दावा केला आहे की, “कुठेतरी पॅरिसमधील सबवेमध्ये, सुरक्षा कॅमेऱ्यांनी एक हृदयस्पर्शी दृश्य टिपले… मुस्लिम पुरुषांच्या गटाला वाटले की त्यांच्याकडे सहज शिकार आली आहे. त्यांच्या दुर्दैवाने, 3 महिला कोणत्या ना कोणत्या फ्रेंच निमलष्करी गटातील आहेत आणि त्यांना ठगांना कसे सामोरे जावे हे चांगले ठाऊक आहे.”
आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91 9999499044) अनेक युजर्सद्वारे हा व्हिडिओ न्यूजचेकरला शेअर केला गेला आहे, आणि तथ्य तपासण्याची विनंती केली आहे.
न्यूजचेकरने InVid वापरून व्हायरल व्हिडिओला कीफ्रेममध्ये विभाजित करून तपासाला सुरुवात केली. आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स पाहिल्या ज्यामुळे आम्हाला समान व्हिडिओ ऑनलाइन वर दिसले.
अशाच एका व्हिडिओमध्ये दोन पुरुष एका पुरुषाच्या सोबत (तिचा जोडीदार असण्याची शक्यता ) असलेल्या महिलेचा छळ करताना दिसत आहेत. भांडण होते आणि शेवटी ती स्त्री दोन्ही छेडछाड करणाऱ्यांना खाली पाडते.
वरील तुलनेने स्पष्ट झाल्याप्रमाणे, दोन्ही व्हिडिओंची सेटिंग सारखीच आहे, आणि दोन्ही व्हिडिओंमध्ये त्रास देणारा एक सामान्य असल्याचे लक्षात आले, जे व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचे सूचित करते.
आम्ही व्हायरल व्हिडिओचे आणखी विश्लेषण केले आणि महिलांना त्रास देणाऱ्या पुरुषांपैकी एकाच्या स्वेटशर्टवर CUC चिन्ह दिसले.
त्यानंतर आम्ही Google वर CUC आणि fight हे कीवर्ड शोधले आणि Campus Univers Cascades चे एक इंस्टाग्राम पृष्ठ सापडले, ज्याने स्वतःला फ्रेंच स्टंट टीम म्हणून Describe केले आहे.
आम्ही 2 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांच्या पेजवर पोस्ट केलेला हाच व्हायरल व्हिडिओ पाहिला. #cucteam, #stuntteam आणि #choregraphy हे हॅशटॅग हे स्क्रिप्टेड असल्याची पुष्टी करतात.
ग्रुपची website, जी Instagram खात्याशी जोडलेली होती, पुढे पुष्टी करते की हा गट एक स्टंट टीम आहे.
“Campus Univers Cascades (CUC), 2008 मध्ये तयार करण्यात आले, हे एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे जे सिनेमा आणि शोमधील स्टंट तंत्रांना समर्पित आहे,” वेबसाइट मध्ये वाचायला मिळाले.
अशाप्रकारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये फ्रेंच निमलष्करी दलातील महिलांनी त्यांचा छळ करणाऱ्यांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे, तो प्रत्यक्षात स्क्रिप्टेड आहे.
Our Sources
Self analysis
Video on Instagram posted by Baroudydaioy2.0, on November 4, 2023
Video on Instagram posted by Campus Univers Cascades,on November 2, 2023
Website of Campus Univers Cascades
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम पंकज मेनन यांनी केले आहे. ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा