Tuesday, November 28, 2023
Tuesday, November 28, 2023

घरFact CheckViralमुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ रामनवमीचा सांगितला जातोय 

मुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ रामनवमीचा सांगितला जातोय 

Claim

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. तो व्हिडिओ मुंबईतील रामनवमीचा सांगितला जात होता.

Fact

व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओतील एका फ्रेमला यांडेक्सवर टाकून सर्च केले. यात आम्हांला प्रतीक देवी नावाच्या एका यु ट्यूब वाहिनीने १९ जुलै २०२० अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला.

सदर व्हिडिओ चिंचपोकळी चिंतामणी विसर्जनाचा आहे, असे सांगितले अजित आहे. आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ मुंबईतील प्रसिद्ध गणेश चतुर्थीच्या मंडळातील आहे. 

२ एप्रिल २०२० रोजी चिंचपोकळीच्या चिंतामणी या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून अपलोड केलेली एक पोस्ट मिळाली. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली होती.

व्हायरल व्हिडिओविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी न्यूजचेकरने चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळाशी संपर्क साधला. 

संस्थेचे महासचिव वासुदेव सावंत यांनी सांगितले,”इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला व्हिडिओ मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील आहे. हा व्हिडिओ २०१९ च्या चिंचपोकळीच्या गणपती विसर्जनातील आहे.”

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ २०१९ मध्ये आयोजित केलेल्या गणपती विसर्जनाचा आहे. 

इथे वाचू शकता : सुप्रीम कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे खरंच आदेश दिले होते ? चुकीची माहिती व्हायरल

Result : False Context / Missing Context

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular