Wednesday, October 9, 2024
Wednesday, October 9, 2024

HomeFact CheckFact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण?...

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा

Claim
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना एका गावात मते देण्यास नकार देऊन मारहाण करण्यात आली.
Fact
हा दावा खोटा आहे. २०१८ मध्ये झालेल्या हावेरी येथील एका आंदोलनात तत्कालीन आमदार बसवराज बोम्माई यांना दुखापत झाली होती. तो जुना व्हिडिओ दिशाभूल करीत व्हायरल करण्यात आला आहे.

कर्नाटकाची विधानसभा निवडणूक विविध कारणांनी देशभरात गाजली आहे. बुधवार दि. १० मे २०२३ रोजी एकीकडे निवडणूक होत असताना कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याबद्दल एक व्हिडीओ शेयर करून दावा करण्यात येत आहे. “#कर्नाटक के #सीएम को जूते और चप्पलों से पिटाई की गई एक गांव में जाकर वोट पूछने पर यह किसी न्यूज़ चैनल वाले ने अभी तक नहीं दिखाया copy ! यह देखिए वीडियो” अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ शेयर करण्यात येत आहे.

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा
Courtesy: Twitter@BPPDELNP

एका गावात मुख्यमंत्री बोम्माई मते मागण्यासाठी गेले असता त्यांना बूट आणि चप्पलांनी मारहाण करण्यात आली. असे सांगणारा हा दावा व्हाट्सअप वरही मोठ्याप्रमाणात फिरू लागला होता. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या दाव्याने भाजपला कसा विरोध होत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु ठेवला होता.

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा

Fact check/ Verification

व्हायरल दाव्यात म्हटल्याप्रमाणे कर्नाटक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी गेलेल्या मुख्यमंत्री बोम्माई यांना कोठे मारहाण झाली आहे का? हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र आम्हाला तसे कोणतेही दाखले किंवा मीडिया रिपोर्ट्स मिळाले नाहीत. आम्ही यासंदर्भातील ‘बोम्माई मारहाण’, ‘बोमाई आंदोलन’ यासारख्या किवर्डस सर्च च्या माध्यमातून शोध घेतला असता, आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाने ३० जानेवारी २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेली एक बातमी सापडली.

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा
Screengrab of Times of India

संबंधित बातमीनुसार २९ जानेवारी २०१८ मध्ये हावेरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस स्थानकासमोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. पीक विमा हप्त्याच्या संदर्भात झालेला विलंब आणि इतर अनेक मागण्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रणित सरकारविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. विद्यमान मुख्यमंत्री बोम्माई हे त्यावेळी शिगाव- सावनूर येथील आमदार होते. तेही या आंदोलनात उपस्थित होते. भाजप कार्यकर्ते आक्रमक होताच पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला मात्र धक्काबुक्कीत बोम्माई यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यांच्यावर कुणी हल्ला केला किंवा मारहाण केली असे आम्हाला या बातमीत आढळले नाही. या आंदोलनानंतर भाजपच्या ४५ कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली होती.

यासंदर्भात प्रसिद्ध झालेले मीडिया रिपोर्ट्स आपल्याला इथे आणि इथे पाहता येतील.

या आंदोलनासंदर्भात व्हिडीओ पुरावा मिळतो का? हे पाहण्याचा प्रयत्न न्यूजचेकरने केला. दरम्यान आम्हाला पब्लिक टीव्ही या चॅनेलने आपल्या अधिकृत चॅनेलवर २९ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या आंदोलनाचा व्हिडीओ बातमी स्वरूपात त्याचदिवशी अपलोड केल्याचे निदर्शनास आले.

पब्लिक टीव्हीने अपलोड केलेला हा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओचाच भाग असला तरीही तो दुसऱ्या कोनातून घेण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले. बसवराज बोम्माई यांच्यासंदर्भात घडलेला प्रसंग या युट्युब व्हिडिओत ०.५० सेकंदापासून पाहता येईल. दरम्यान दोन्ही व्हिडिओंची तुलना करता गॉगल घातलेली एक व्यक्ती, टक्कल पडलेला एक माणूस आणि पाठीमागील निळ्या रंगाची पोलीस बस समान असल्याचे आम्हाला पाहावयाला मिळाले.

व्हायरल व्हिडिओमध्ये बसवराज बोम्माई यांच्या बाजूला गॉगल घातलेली एक व्यक्ती दिसते. तीच व्यक्ती आम्हाला मूळ व्हिडिओतही पाहायला मिळाली.

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा

याचबरोबरीने डोक्याला टक्कल पडलेली एक व्यक्तीही दोन्ही व्हिडिओमध्ये कॉमन असल्याचे आम्हाला दिसून आले.

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा

व्हायरल व्हिडिओच्या पाठीमागे दिसणारी पोलीस बस मूळ व्हिडिओत जमावाच्या शेजारी दिसते.

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा

याचबरोबरीने जांभळ्या रंगाचा शर्ट घातलेली आणि गळ्यात टॉवेल घातलेली एक व्यक्तीही दोन्ही व्हिडिओत कॉमन असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Fact Check: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्माई यांना मते देण्यास नकार देऊन झाली मारहाण? खोटा आहे हा दावा

यानंतर आम्ही या घटनेवेळी तेथे उपस्थित असलेले हावेरी येथील ज्येष्ठ पत्रकार फकीरय्या यांच्याशी संपर्क साधून व्हायरल व्हिडीओ संदर्भातील माहिती विचारून घेतली. त्यांनी “सदर व्हिडीओ हा सध्याचा नसून २०१८ मधील हावेरी येथे झालेल्या आंदोलनाचाच असल्याचे” स्पष्टपणे सांगितले. “त्यावेळी सध्याचे मुख्यमंत्री बोम्माई हे आमदार होते. आंदोलनाला ते उपस्थित होते. दरम्यान जमावाला आवर घालत असताना त्यांच्या डोळ्याला काठी लागून दुखापत झाली.” अशी माहिती त्यांनी दिली.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात हावेरी येथे २०१८ मध्ये झालेल्या आंदोलनाचा व्हिडीओ शेयर करीत बसवराज बोम्माई यांना कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मारहाण झाल्याचा करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

Result: False

Our Sources
News published by Times of India on January 30, 2018
Video uploaded by Public TV on January 29, 2018
Conversation with senior journalist from Haveri Mr. Fakirayya
Self Analysis


Inputs by Ishwarachandra B. G.

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular