Authors
सप्टेंबर महिन्याची अखेर आणि ऑक्टोबर महिन्याची सुरुवातही अनेक फेक दाव्यांमुळे चर्चेत राहिली. मुंबईत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवत आहेत, असा दावा करण्यात आला. कर्नाटकातील लव्ह जिहादचे समर्थन करणाऱ्या CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे चित्र, असा दावा करण्यात आला. हरियाणातील मेवात येथील काँग्रेसच्या निवडणूक रॅलीचा व्हिडिओ, असा दावा झाला. बेंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडातील मुख्य आरोपी अश्रफ आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
हे मुंबईतील मुस्लिमांचे शक्तिप्रदर्शन नाही
मुंबईत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
हे कर्नाटकातील CMR शॉपिंग मॉलचे होर्डिंग नव्हे
कर्नाटकातील लव्ह जिहादचे समर्थन करणाऱ्या CMR शॉपिंग मॉलच्या होर्डिंगचे चित्र, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
हा व्हिडीओ हरियाणा येथील काँग्रेस प्रचाराचा नाही
हरियाणातील मेवात येथील काँग्रेसच्या निवडणूक रॅलीचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
बेंगळुरू महालक्ष्मी हत्याकांडात जातीय अँगल आहे?
बेंगळुरू येथील महालक्ष्मी हत्याकांडातील मुख्य आरोपी अश्रफ आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा