Tuesday, November 28, 2023
Tuesday, November 28, 2023

घरFact CheckViralऔदुंबराचे दुर्मिळ फूल पन्नास वर्षात एकदाच उमलते? याचे सत्य जाणून घ्या

औदुंबराचे दुर्मिळ फूल पन्नास वर्षात एकदाच उमलते? याचे सत्य जाणून घ्या

Claim

औदुंबराचे दुर्मिळ फूल हे कधी कोणाला दिसत नाही. त्याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा! ५० वर्षामध्ये ते एकदाच फुलते. 

फोटो साभार : Facebook/page/आपल्या मैत्रीचा वेल खुप जपायचा

Fact 

औदुंबराचे दुर्मिळ फूल याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो फोटो गुगल रिव्हर्स करून शोधला. तेव्हा आम्हांला लोकसत्ताची ९ ऑक्टोबर २०१६ रोजीची एक बातमी सापडली. महाराष्ट्रातील मिरजमध्ये उंबराच्या झाडाला फूल लागल्याची चर्चा शहरात रंगली. तिथे पूजा देखील करण्यात आली. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी ती बुरशी असल्याचे सांगितल्यावर लोकांमध्ये खळबळ उडाली. २०१९ मध्ये न्यूजचेकर मराठीने याचे फॅक्ट चेक केले होते. 

फोटो साभार : Loksatta

या व्यतिरिक्त आम्हांला लोकमतची ८ ऑक्टोबर २०१६ रोजीची एक बातमी मिळाली. त्यानुसार, अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ते फूल नसून बुरशी आहे, असे लोकांना सांगितले. आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल फोटोत केला जाणारा उंबराच्या फुलाचा दावा चुकीचा आहे. ते फूल नसून त्यावर बुरशी आलेली आहे. 

Result : False

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular