Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
आठवड्याच्या सुरुवातीलाच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मुंबईत कस्टम अधिकाऱ्यांनी रोखल्याचा दावा व्हायरल झाला. तुमच्या गुगल पे खात्यावरून सहजासहजी पैसे लंपास करण्यात येत असल्याच्या संदेशांनी संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला. या जगात गाय हा असा एकमेव प्राणी आहे जो श्वसन करताना आतमध्ये ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजनच बाहेर सोडतो असा दावा करण्यात आला, तर अफजल खानाची कबर पाडली म्हणून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रडू कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो हाती घेतल्याचा दावा करण्यात आला. मुंबई शहरात क्रिकेटर कायरन पोलार्ड याचे नाव रस्त्याला देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. त्याचप्रमाणे, इतर अनेक प्रकरणांवर व्हायरल झालेल्या खोट्या दाव्यांचे सत्य आमच्या या अहवालात वाचता येईल.

अभिनेता शाहरुख खान याला मुंबई विमानतळावर अडवून कस्टम अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याचा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले.

मुंबई इंडियन्स मधून निवृत्त झालेला क्रिकेटपटू कायरन पोलार्ड याचे नाव मुंबई येथील एका रस्त्याला देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासणीत हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

गाय हा जगातील एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन सोडतो असा दावा करण्यात आला होता. यासंदर्भात आम्ही केलेल्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.

माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना रडू फुटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. प्रताप गडावरील अफजल खानाची कबर तोडल्यामुळे त्यांना रडू फुटल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आमच्या तपासात जुना व्हिडीओ घेऊन बनावट दावा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो घेतल्याचे सांगून त्यांचे व्हायरल पोस्टद्वारे कौतुक झाले. प्रत्यक्षात आमच्या तपासणीत राहुल गांधी यांच्या हाती दुसरेच छायाचित्र आढळले. हा दावा खोटा होता हेच निदर्शनास आले आहे.

तुमच्या गुगल पे खात्यावरून सहजासहजी पैसे लंपास करण्याचा नवा फ्रॉड सुरु आहे. सावधगिरी बाळगा नाहीतर हातचे पैसे घालवाल असे सांगणारे संदेश सध्या व्हायरल होत आहेत. असे संदेश आल्यानंतर आम्ही तज्ञांची मते घेऊन तथ्य पडताळणी केली. आमच्या खोलवर तपासात आम्हाला ही माहिती मिळाली.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
December 13, 2025
Runjay Kumar
December 13, 2025
Vasudha Beri
December 12, 2025