Authors
मागील आठवड्यातही खोटी माहिती पसरविण्याचा प्रकार सोशल मीडियावर पाहायला मिळाला. खासदार संजय राऊत यांचा टॅटू एका कार्यकर्त्याने आपल्या खासगी ठिकाणी काढून घेतल्याचा दावा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेब याला आपला भाऊ म्हटले असा एक दावा करण्यात आला. काँग्रेसने छत्तीसगढ येथे झालेल्या आपल्या महाअधिवेशनात सर्व महनीय नेत्यांना सोनसाखळी घालून स्वागत केले असा दावा करण्यात आला. तसेच कुतुबमिनार चा भाग असल्याचे सांगून एक फोटो व्हायरल करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्ट मध्ये पाहता येईल.
राऊतांच्या टॅटू चा खोटा दावा
खासदार संजय राऊत यांचे टॅटू एका कार्यकर्त्याने आपल्या खासगी अवयवावर काढून घेतले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणता औरंगजेब उद्धव ठाकरेंचा भाऊ?
एका व्हिडिओचा काही भाग प्रसारित करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुघल सम्राट औरंगजेब ला आपला भाऊ म्हटले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा संदर्भ वगळून खोटेपणाने करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
कुतुबमिनार मुघलांनी बांधला नाही
चित्रात दिसणारा स्तंभ हा मुघलांनी बांधलेल्या कुतुबमिनारमध्ये स्थापित केलेल्या प्रसिद्ध लोखंडी स्तंभाचा आहे, ज्यावर मुघलांच्या पूर्वजांची नावे कोरलेली आहेत. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
सोनसाखळ्या घालून झाले स्वागत?
छत्तीसगढ येथे झालेल्या काँग्रेसच्या महाअधिवेशनात तेथील मुख्यमंत्र्यांनी सर्व महनीय व्यक्तींचे स्वागत त्यांच्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून केले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उघडकीस आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in