Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: कोरोना संकटापासून ते ताऊक्ते वादळापर्यंत या आठवड्यातील व्हायरल दाव्यांचे Fact...

Weekly Wrap: कोरोना संकटापासून ते ताऊक्ते वादळापर्यंत या आठवड्यातील व्हायरल दाव्यांचे Fact Check

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे जेथे दररोज फेक न्यूज मोठ्या प्रमाणात शेअर होतात. सोशल मीडिया युजर्स दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती शेअर करताना दिसतात. या आठवड्यात असेच काही घडले. कोरोना संकट ते ताऊक्याते वादळासह इतर अनेक विषयांवर युजर्सनी या आठवड्यात चुकीची माहिती शेअर केली. आमच्या टीमने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे आणि त्यांचे सत्य आपल्यासमोर मांडले आहे.

कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना सरकारकडून वर्षाला 50 हजार मिळणार?

कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना सरकारकडून वर्षाला 50 हजार मिळणार असल्याचा दावा करण्या-या अनेक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या जिजाऊ/ जिजमाता योजना अशाच महिलांसाठी आहे अशीही माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे. पण हा दावा खोटा आहे. सरकारने असी कोणतीही योजना सुरु केलेली नाही. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल व्हिडिओ ताऊक्ते वादळादरम्यान कोकणातील समुद्र किना-यावर उसळलेल्या लाटांचा नाही

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ ताऊक्ते वादळादरम्यान कोकणातील समुद्र किना-यावर उसळलेल्या लाटांचा असल्याचा दावा केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताउक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीला बसला. पण हा व्हिडिओ कोकणातील नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

राज्य सरकारने जारी केलेली नाही 1 जून नंतरची अनलाॅकची नियमावली, जुनी बातमी व्हायरल

लाॅकडाऊन संपण्यास 10 दिवस बाकी असताना 1 जून नंतरची अनलाॅकची नियमावली सांगणारा टिव्ही 9 मराठीच्या बातमीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात टप्प्याटप्प्याने अनलाॅक होणार असल्याचे व कशा प्रकारे शिथिलता मिळणार आहे याविषयी माहिती देण्यात आली आहे. पण ही बातमी मागील वर्षीची आहे तीच आताची म्हणून शेअर होत आहे. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटले?

रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे असा एक दावा सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मागील महिन्यात टाटा स्टीलने दररोज 800 टन इतका पुरवठा सुरु केला होता. यामुळे देशात पुन्हा एकदा टाटा समुहाची प्रशंसा केली जात आहे. अशातच रतन टाटा यांच्या नावाने विधान व्हायरल होत आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular