Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: सप्ताहभरात सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दाव्यांचे फॅक्ट चेक

Weekly Wrap: सप्ताहभरात सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दाव्यांचे फॅक्ट चेक

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे जेथे दररोज फेक न्यूज मोठ्या प्रमाणात शेअर होतात. सोशल मीडिया युजर्स दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती शेअर करताना दिसतात. या आठवड्यात असेच काही घडले. कोरोना लस ते राजकीय घडामोडींबाबत तसेच इतर अनेक विषयांवर युजर्सनी या आठवड्यात चुकीची माहिती शेअर केली. आमच्या टीमने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे आणि त्यांचे सत्य आपल्यासमोर मांडले आहे.

रशियाने कोविड-19 च्या मृतांचे पोस्टमार्टम करुन सत्य समोर आणले?

रशियाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नियमावलीविरुद्ध जात कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या लोकांचे पोस्टमार्टेम केले आणि कोरोना हा व्हायरस नसून बॅक्टेरिया असल्याचे सत्य समोर आहे. असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. पण हे सत्य नाही.रशियाने असा कुठलाही दावा केलेला नाही.उलट रशियाने लस निर्मिती केली आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हाट्सअॅप आणि फोन काॅल्सचे नवीन संप्रेषण नियम लागू होणार असल्याचा मेसेज व्हायरल,

व्हाट्सअॅप आणि फोन काॅल्सचे नवीन संप्रेषण नियम लागू होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडितयत व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, सोशल मीडियावर काय पोस्ट करायचे आणि काय नाही याबाबत सरकारने नवे नियम लागू केले आहेत. पण हे सत्य नाही. सरकारने असे नियम केलेले नाहीत. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार? हे आहे सत्य

केंंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार असल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या पोस्टसोबत ही रक्कम मिळवण्यासाठीच्या अर्जाची पीडीएफ देखील शेअर केली जात आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

जालन्यातील भाजपा नेत्याला पोलिसांकडून मारहाणीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल, हे आहे सत्य

दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ तेलगंणामधील हाॅस्पिटलमधील आहे,यातील पोलिस बेदम मारहाण करत असलेला व्यक्ती रुग्णवाहिका चालक आहे. जो आपल्याला भाडे मिळावे, रुग्णवाहिकेचा धंदा वाढावा यासाठी रुग्णांचे आॅक्सीजन बंद करुन त्यांना जीवे मारत असे. पण हे सत्य नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular