Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. बाॅलीवुड अभिनेता अजय देवगणला दिल्ली एअरपोर्टवर मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला तर कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेणार असल्याचा दावा देखील व्हायरल झाला. याशिवाय राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा नोटा मोजताना फोटो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रिकाम्या मैदानाला हातवारे करुन अभिवादन करत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.
याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.
अजय देवगणला शेतकरीपुत्रांनी दिल्ली एअरपोर्टवर मारहाण केली आहे का?
सोशल मीडियावर मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही लोक भांडताना दिसत आहेत.दावा केला जात आहे की, अभिनेता अजय देवगणला शेतकरीपुत्रांनी दिल्ली एअरपोर्टवर मारहाण केली आहे. ब-याच यूजर्सनी व्हिडीओ शेअर केला आहे. पण हे सत्य नाही. पोस्टमधील दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने सरकार राज्यातील सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेणार आहे?
लोकांनी कोरोनाचे निर्बंध पाळले नाहीत तर 2 एप्रिलनंतर राज्यात लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पुण्यात दिला आहे. अशातच राज्यातील सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यात येणार असल्याची पोस्ट व्हायरल होत आहे. पण हे सत्य नाही सरकारने सरसकट रुग्णालये ताब्यात घेतेलेली नाहीत. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या व्हायरल फोटोचे काय आहे सत्य?
राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा एका फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दोघांसमोर दोन हजार रुपयांच्या नोटांची बंडले आहेत. शिवाय शेल्फमध्ये सोनिया गांधी यांचा फोटो देखील आहे दावा केला जात आहे की, हप्ता वसुलीतून मिळालेली रक्कम दोघे मोजत आहेत. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकाम्या मैदानाला अभिवादन केलेले नाही, हे आहे सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिकाम्या मैदानाला अभिवादन केले असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात नरेंद्र मोदी हेलिकाॅप्टरजवळ मैदानात उभे राहून हातवारे करत आहेत मात्र पुढे कुठेही माणसांची गर्दी दिसत नाही. पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्याशिवाय तिथे एक ही माणूस दिसत नाही. पण हे सत्य नाही. हा ब्लर व्हिडिओ आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.