Fact Check
Weekly Wrap: अश्विनी वैष्णव भावनिक ते रेखा गुप्तांचा युद्धकला सराव पर्यंतचे फॅक्ट चेक
फेब्रुवारी महिन्याचा चौथा आठवडाही सोशल मीडियावरील अनेक पोस्टनी गाजला. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भावुक झाल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. छावा चित्रपटावर बंदीची मागणी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले, असा दावा करण्यात आला. व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना एका अमेरिकन पत्रकाराने भारतीय पत्रकाराची थट्टा केली, असा दावा झाला. पारंपारिक युद्धकलेचा सराव करणारी महिला दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी नंतर अश्विनी वैष्णव भावनिक?
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव भावुक झाल्याचा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

भारतीय वंशाच्या पत्रकारावर अमेरिकन पत्रकार हसतानाचा व्हिडिओ २०२० चा
व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना एका अमेरिकन पत्रकाराने भारतीय पत्रकाराची थट्टा केली, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

छावा चित्रपटावर बंदीची मागणी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले?
छावा चित्रपटावर बंदीची मागणी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.

पारंपारिक युद्धकलेचा सराव करणारी महिला दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता नाहीत
पारंपारिक युद्धकलेचा सराव करणारी महिला दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.