Authors
मागील आठवडाही सोशल मीडियावरील फेक पोस्टमुळे गाजला. लोकसभेतील भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यांवर फिरताना दिसला, असा दावा करण्यात आला. मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री मुस्लिमांना चेतावणी देत आहेत, असा दावा एक व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. राम मंदिराचे पुजारी म्हणून निवडल्या गेलेल्या मोहित पांडे यांची अश्लील चित्रे आहेत असे सांगणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. केरळमधील सबरीमालामध्ये भगवान अय्यप्पाच्या एका छोट्या भक्ताला अटक करण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर?
लोकसभेतील भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल मद्यधुंद अवस्थेत रस्त्यांवर फिरताना दिसला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत
मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री मुस्लिमांना चेतावणी देत आहेत, असा दावा एक व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
अश्लील फोटोंमध्ये मोहित पांडे नाही
राम मंदिराचे पुजारी म्हणून निवडल्या गेलेल्या मोहित पांडे यांची अश्लील चित्रे आहेत असे सांगणारा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे निदर्शनास आले.
रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केली?
केरळमधील सबरीमालामध्ये भगवान अय्यप्पाच्या एका छोट्या भक्ताला अटक करण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा