Friday, June 14, 2024
Friday, June 14, 2024

HomeFact CheckFact Check: रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे

Fact Check: रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
केरळमधील सबरीमालामध्ये भगवान अय्यप्पाच्या एका छोट्या भक्ताला अटक करण्यात आली आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. मुलाला पोलिसांनी अटक केली नव्हती.

पोलिसांसमोर हात जोडून ‘पापा-पापा’ म्हणत रडणाऱ्या मुलाचा त्रासदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओसोबत असा दावा केला जात आहे की भगवान अय्यप्पा यांच्या एका छोट्या भक्ताला केरळमधील सबरीमाला येथून अटक करण्यात आली आहे. एक X (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट मध्ये हा व्हिडीओ शेयर करून लिहिले आहे की, “आज हे पाहून वाटत आहे कि केरळमध्ये तालिबान सरकार आहे. भगवान अय्यप्पाच्या छोट्या भक्तांना अशा प्रकारे अटक करण्यात आली. हे भारताचे दुर्दैव आहे की येथे हिंदू मोठ्या संख्येने आहेत पण जातींमध्ये विभागले गेले आहेत. काळजी करू नका, पुढचा नंबर तुमचाही असू शकतो. कदाचित त्यामुळेच विरोधकांचा दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय अजेंडा सुरू आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे.’’

Fact Check: रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: X/@iAkankshaP

दुसर्‍या पोस्टमध्ये X युजरने असे लिहिले आहे की, ‘केरल में हिंदुओं की स्थिति. उन्होंने एक बच्चे को भी नहीं बख्शा.. ‘

Fact Check: रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: X:@ajaychauhan41

हा व्हायरल व्हिडिओ सुमारे 38 सेकंदांचा आहे. या व्हिडीओमध्ये बालक ‘अप्पा… अप्पा…’ (पापा) अशी हाक मारून आपल्या आजूबाजूला कोणालातरी शोधत असल्याचे दिसत आहे. तो पोलिसांसमोर हात जोडून रडतानाही दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी जोडलेल्या भागात बालक कुणाकडे तरी बघून हात हलविताना दिसत आहे.

FactCheck/Verification

व्हायरल व्हिडिओच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या लोगोवरून हे समजू शकते की हा व्हिडिओ एशियानेट न्यूज़एबल (Asianet Newsable) या मल्याळम न्यूज चॅनेलचा आहे. काही कीवर्ड वापरून शोधताना, आम्हाला 12 डिसेंबर 2023 रोजी Asianet च्या X हँडलवर शेअर केलेली पोस्ट आढळली. हा व्हिडिओ या पोस्टमध्ये उपलब्ध आहे. व्हिडिओसोबत लिहिले आहे की, ‘सबरीमाला गर्दी: रडणाऱ्या मुलाचा त्याच्या वडिलांना शोधण्यासाठी मदत मागणारा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे.’ या व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या माहितीमध्ये मुलाच्या अटकेचा कुठेही उल्लेख नाही.

Fact Check: रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: X/@AsianetNewsEN

शोध घेतल्यावर आम्हाला 12 डिसेंबर रोजी एशिया नेटने प्रकाशित केलेला एक रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “सबरीमालामध्ये रस्ता चुकलेल्या एका रडणाऱ्या मुलाचा व्हिडिओ समोर आला आहे. निलक्कलमधील गर्दीत हरवलेल्या आपल्या वडिलांचा शोध घेत असलेले मूल या फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांसमोर हात जोडून ओरडणाऱ्या मुलाने अखेर वडिलांना पाहून हात हलवले.” या रिपोर्टवरून हे स्पष्ट होते की, मुलाला पोलिसांनी अटक केली नसून, मूल गर्दीत हरवलेल्या वडिलांसाठी हाक मारत होते.

Fact Check: रडणाऱ्या मुलाला केरळ पोलिसांनी अटक केल्याचा व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: Asianet Newsable

त्यानंतर न्यूजचेकर ने त्रावणकोर देवस्वोम बोर्ड चे पीआरओ सुनील अरुमनूर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, “हा व्हिडीओ खरंतर एका मुलाचा आहे ज्याला सबरीमाला येथे गर्दी असताना त्याचे वडील सापडले नाहीत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मुलाची त्याच्या वडिलांशी भेट झाली. पोलिस किंवा अधिकार्‍यांकडून कोणतीही चूक झालेली नाही.”

गेल्या पाच दिवसांपासून सबरीमाला येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दीत झालेल्या गैरव्यवस्थापनाबद्दल केरळ सरकारवर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. प्रचंड गर्दीमुळे अनेक यात्रेकरू शबरीमाला मंदिर आणि भगवान अय्यप्पाचे दर्शन न घेता पंडालमहून परतत आहेत. या व्हायरल व्हिडिओबाबत न्यूज 18 ने वृत्तही प्रसिद्ध केले आहे.

Conclusion

रडणाऱ्या मुलाला पोलिसांनी अटक केली नसल्याचे आमच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. प्रचंड गर्दीमुळे मुलाचे वडील कुठेतरी हरवले होते. मात्र, नंतर मुलाला वडील सापडले.

Result: Missing Context

Our Sources
Tweet by Asianet Newsable dated december 12, 2023
Report by Asianet Newsable dated december 12, 2023
Conversation with Travancore Dewaswom Board PRO Sunil Arumanoor
Report by News 18


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular