Saturday, September 7, 2024
Saturday, September 7, 2024

HomeFact CheckFact Check: मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत, येथे वाचा...

Fact Check: मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत, येथे वाचा पूर्ण सत्य

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
मध्यप्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ ज्यामध्ये ते मुस्लिमांना चेतावणी देत आहेत.

Fact
हा व्हिडिओ मध्यप्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा नसून भोपाळमधील भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांचा आहे.

मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री यादव असल्याचे सांगत एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मीडियाशी बोलत आहे. “मुस्लिमांनी आपले इतर धार्मिक विधी करावेत मात्र देशविरोधी वागल्यास ठेचून काढले जाईल.” असे व्हिडिओत ऐकायला मिळते.

आम्हाला हा दावा सर्वप्रथम व्हाट्सअपवर मिळाला.

Fact Check: मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत, येथे वाचा पूर्ण सत्य
Screengrab of Whatsapp Viral Claim

व्हिडिओमध्ये ती व्यक्ती कठोर स्वरात सांगत आहे की, आम्ही लोकांना नमाज अदा करण्यास, मोहरमची मिरवणूक काढण्यास किंवा रोजा ठेवण्यास मनाई करत नाही, परंतु जर कोणी देशविरोधी घोषणा दिल्या तर त्याला सोडले जाणार नाही. पाकिस्तान आणि तालिबानबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांनी एकदा तिथे राहून दाखवावे, असेही ती व्यक्ती म्हणते. X (पूर्वीचे ट्विटर) आणि फेसबुकवर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

Fact Check/Verification

व्हायरल दावा मोठ्याप्रमाणात शेयर केला जात असल्याने Newschecker ने यावर शोध घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला YouTube वर एक समान व्हिडिओ सापडला जो वेगळ्या अँगल मधून शूट केला गेला होता. हा व्हिडिओ 23 ऑगस्ट 2021 रोजी NYOOOZ UP- Uttarakhand नावाच्या चॅनेलवरून शेअर करण्यात आला होता. व्हिडिओचे शीर्षक काहीसे असे आहे, “BJP नेता Rameshwar Sharma बोले- अगर मां का दूध पिया है, तो कुछ दिन Taliban में गुजारो…”. त्याचे मराठीतील भाषांतर, “भाजप नेते रामेश्वर शर्मा म्हणाले – तुम्ही आईचे दूध प्यायले असेल तर काही दिवस तालिबानमध्ये घालवा…”. असे आहे.

या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीचे तेच विधान ऐकू येते जे व्हायरल व्हिडिओमध्ये आहे. काही इतर YouTube चॅनेलनेही हा व्हिडिओ ऑगस्ट 2021 मध्ये रामेश्वर शर्माचा व्हिडिओ म्हणून शेअर केला होता.

रामेश्वर शर्मा भोपाळच्या हुजूर मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. त्याचा फोटो इंटरनेटवर उपलब्ध व्हायरल व्हिडिओशी मिळता जुळता आहे. आम्ही रामेश्वर शर्मा यांच्या अधिकृत X खात्यावर जाऊन त्यांचे फोटो तपासले असता याची माहिती मिळाली.

Fact Check: मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत, येथे वाचा पूर्ण सत्य

या व्हिडिओच्या वेळी उज्जैनमध्ये देशविरोधी घोषणा दिल्या जात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. रामेश्वर शर्मा यांनी याबाबतचे निवेदन दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

Fact Check: मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत, येथे वाचा पूर्ण सत्य
Screengrab of Zee News

आमच्या तपासात व्हायरल व्हिडीओ 2021 मधील असल्याचे तसेच व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती भाजपचे भोपाळ येथील आमदार रामेश्वर शर्मा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान व्हायरल दाव्यात सदर व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री यादव असल्याचा केलेला दावा खोटा असल्याचे दिसून आले. मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेलेले डॉ. मोहन यादव व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीसारखे दिसत नाहीत. हे त्यांच्या अधिकृत X खात्यावरील फोटोंवरून स्पष्ट होते.

Fact Check: मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत, येथे वाचा पूर्ण सत्य
Courtesy: X@DrMohanYadav51

डॉ. मोहन यादव हे उद्या मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Fact Check: मुस्लिमांना चेतावणी देणारी व्यक्ती मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री नाहीत, येथे वाचा पूर्ण सत्य
Courtesy: India Today

महत्वाचे म्हणजे सदर दावा यापूर्वी उज्जैनचे कलेक्टर ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा देणाऱ्यांना ठेचून काढले जाईल, असे म्हणत असल्याच्या नावाखाली व्हायरल करण्यात आला होता. त्यावेळी 19 मे 2023 रोजी न्यूजचेकर हिंदीने फॅक्टचेक केले होते. तेंव्हाचे आर्टिकल येथे वाचता येईल.

Conclusion

त्यामुळे हा व्हिडिओ मध्यप्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा नसून भोपाळमधील भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांचा असल्याचे आणि दोन वर्षे जुना असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
YouTube video by NYOOOZ UP- Uttarakhand on August 23, 2021
YouTube video by Mradubhashi on August 21, 2021
News published by Zee News on August 21, 2021
News published by India Today on December 12, 2023
Self Analysis

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular