Authors
पावसाच्या बरसातीबरोबरच जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. दिल्लीत असलेल्या ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम आहे, असा दावा करण्यात आला. आपल्या घरापासून ६० किमीच्या आत टोल भरण्याची गरज नाही. असे नितीन गडकरी म्हणाले, असा दावा झाला. मुंबईच्या धारावीमध्ये पोलिसांसमोरच बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची जिहादीने हत्या करतानाचा व्हिडीओ असे सांगत एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. राज्यसभेत मराठीत बोलल्याने मेधा कुलकर्णींना प्रियांका चतुर्वेदींनी रोखले, असा दावा करण्यात आला. भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींना अभिवादन केले नाही. असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम नाही
दिल्लीत असलेल्या ‘राम कचोरी’ दुकानाचा मालक मुस्लिम आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
घरापासून ६० किमीच्या आत टोल भरण्याची गरज नाही?
आपल्या घरापासून ६० किमीच्या आत टोल भरण्याची गरज नाही. असे नितीन गडकरी म्हणाले, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने दिशाभूल करीत असल्याचे उघड झाले.
निर्घृण हत्येचा व्हिडिओ धारावीचा नाही
मुंबईच्या धारावीमध्ये पोलिसांसमोरच बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची जिहादीने हत्या करतानाचा व्हिडीओ असे सांगत एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
राज्यसभेत मराठीत बोलल्याने मेधा कुलकर्णींना प्रियांका चतुर्वेदींनी रोखले?
राज्यसभेत मराठीत बोलल्याने मेधा कुलकर्णींना प्रियांका चतुर्वेदींनी रोखले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींना अभिवादन केले नाही?
भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींना अभिवादन केले नाही. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले आहे.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा