Thursday, May 30, 2024
Thursday, May 30, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार,...

Weekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार, मेहबुबा मुफ्तीची मूर्तिपूजा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडाही सोशल मीडियावर होणाऱ्या अनेक फेक दाव्यानी गाजला. वाराणसी येथे पडलेल्या जुन्या फ्लायओव्हरच्या पिलरचा व्हिडीओ शेअर करून तो पिलर ठाणे येथे पडला असा दावा करण्यात आला. बाजारात अमूल बटरचे चायना मेड उत्पादन आले आहे, असा दावा झाला. उत्तरप्रदेश सरकारने गांजा ओढणाऱ्यांना नोकरीची संधी दिली आहे. जम्मू काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आता मूर्तिपूजा सुरु केली आहे. आदी दाव्यान्नी चर्चा घडविली. काश्मीर फाईल्स या चित्रपटाला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला हा दावाही मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक आपल्याला या रिपोर्टमध्ये वाचता येईल.

Weekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार, मेहबुबा मुफ्तीची मूर्तिपूजा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

गांजा ओढणाऱ्यांसाठी युपी सरकारची व्हेकेन्सी?

योगीराजमध्ये काहीही चालेल असे सांगत आता युपी सरकारने गांजा ओढणाऱ्यांसाठी नवी व्हेकेन्सी काढली आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

Weekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार, मेहबुबा मुफ्तीची मूर्तिपूजा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

काश्मीर फाईल्स ला कोणता पुरस्कार मिळाला?

काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरणावर आधारित ‘दी काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

Weekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार, मेहबुबा मुफ्तीची मूर्तिपूजा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

फ्लायओव्हर चा तो व्हिडीओ ठाण्यातील नाही

ठाण्यात एका फ्लायओव्हर चा पिलर कोसळण्याचा दावा करून एक व्हिडीओ शेयर करण्यात आला. आमच्या तपासात तो व्हिडीओ ठाण्यातील नसल्याचे स्पष्ट झाले.

Weekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार, मेहबुबा मुफ्तीची मूर्तिपूजा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

अमूल बटर नव्हे तो व्हिडीओ डुप्लिकेट

अमूल बटर चे चायना मेड डुप्लिकेट उत्पादन बाजारात आले आहे. असे सांगून एक व्हिडीओ शेयर करण्यात आला. आमच्या तपासात तो व्हिडिओच बनावट आणि खोटा दावा करीत असल्याचे निदर्शनास आले.

Weekly Wrap: बाजारात आलेले चायनामेड अमूल बटर, काश्मीर फाईल्स ला फाळके पुरस्कार, मेहबुबा मुफ्तीची मूर्तिपूजा तसेच या आठवड्यातील प्रमुख फॅक्टचेक

मेहबूबा मुफ्ती यांनी केंव्हा केली पूजा?

जम्मू आणि काश्मीर च्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी कलम ३७० हटल्यानंतर आता मंदिरात जाऊन पूजा अर्चा सुरु केली असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular