Authors
मार्च महिन्याचा शेवटचा आठवडाही सोशल मीडियावरील फेक क्लेम्समुळे चर्चेत राहिला. फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधी सातव्या क्रमांकावर असल्याचा दावा करण्यात आला. गुड मॉर्निंग मेसेजवर 18% पर्यंत जीएसटी आकारला जाणार, असा दावा झाला. विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत असताना असे सांगत एक इमेज व्हायरल करण्यात आली. कॅमेऱ्यावर मुलांचे अपहरण दाखवणारा चोरून काढलेला व्हिडीओ असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
फोर्ब्सच्या सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधी सातव्या क्रमांकावर आहेत?
फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक शिक्षित नेत्यांच्या यादीत राहुल गांधी सातव्या क्रमांकावर असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
गुड मॉर्निंग मेसेजवर 18% पर्यंत जीएसटी?
गुड मॉर्निंग मेसेजवर 18% पर्यंत जीएसटी आकारला जाणार, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता का?
विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत असताना असे सांगणारा दावा व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
कॅमेऱ्यावर मुलांचे अपहरण दाखवणारा व्हिडिओ खरा नाही
कॅमेऱ्यावर मुलांचे अपहरण दाखवणारा चोरून काढलेला व्हिडीओ असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा