Saturday, July 20, 2024
Saturday, July 20, 2024

HomeFact CheckFact Check: विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता का?...

Fact Check: विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता का? नाही, व्हायरल चित्र एडिटेड आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत असताना.
Fact
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे छायाचित्र विराट कोहलीच्या मोबाईल स्क्रीनवर एडिट करून जोडण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छायाचित्रात ते त्यांच्या मोबाईलकडे पाहत असून फोन स्क्रीनवर राहुल गांधी यांचे छायाचित्र दिसत आहे. या छायाचित्रासह सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत आहे. तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे छायाचित्र विराट कोहलीच्या मोबाइल स्क्रीनवर एडिट करून जोडले गेले आहे.

दाव्याच्या कॅप्शनमध्ये, “राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहताना विराट कोहली. त्याला पण माहित आहे कोणाला पाहायचं कोणाला नाही. राहुल गांधी मुद्द्याचं आणि देशहिताचं बोलतात. फेकत नाहीत. पत्रकार परिषद फक्त राहुल गांधीच घेतात हे ही विराट ला माहित आहे. नाहीतर काही फट्टू घाबरून PC च घेत नाहीत आणि पळून जातात..!” असे लिहिले आहे.

Fact Check: विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता का? नाही, व्हायरल चित्र एडिटेड आहे

Fact Check/ Verification

दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही चित्राचा Google रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला 21 मार्च 2024 रोजी @Blunt IndianGal नावाच्या X युजरने शेअर केलेली पोस्ट आढळली. विराट कोहलीचा असाच एक फोटो पोस्टमध्ये शेअर करण्यात आला आहे, ज्याचे कॅप्शन असे आहे – “क्या आप लोग डिकोड कर सकते हैं कि कोहली अपने फोन में क्या स्क्रॉल कर रहे हैं।”

Fact Check: विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता का? नाही, व्हायरल चित्र एडिटेड आहे
Screengrab from X post by @BluntIndianGal

व्हायरल चित्र आणि @Blunt IndianGal ने पोस्ट केलेल्या चित्राची तुलना केल्यावर, आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की व्हायरल चित्र एडिट करून बदलले गेले आहे, या चित्रात राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचे चित्र जोडले गेले आहे.

Fact Check: विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता का? नाही, व्हायरल चित्र एडिटेड आहे
(L-R) Viral image and image posted on X by @BluntIndianGal

पुढील तपासात आम्हाला आढळले की हा फोटो कोहलीच्या व्हेरीफाईड फॅन पेज विराटगँगने 21 मार्च 2024 रोजी फेसबुकवर देखील शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की – “जियो विज्ञापन की शूटिंग शुरू होने से पहले विराट कोहली चिल करते हुए।”

Fact Check: विराट कोहली मोबाईलवर राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत होता का? नाही, व्हायरल चित्र एडिटेड आहे
Screengrab from Facebook post by ViratGang

तपासणी केल्यावर, आम्हाला आढळले की मूळ प्रतिमा 21 मार्च 2024 रोजी कोहलीच्या अनेक चाहत्यांनी शेअर केली होती. जी येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकते, तर व्हायरल दावा 22 मार्च 2024 रोजी आणि त्यानंतर शेअर केला गेला. जो इथे आणि इथे बघता येईल.

Conclusion

आमच्या तपासातून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलो की, विराट कोहली राहुल गांधींची पत्रकार परिषद पाहत असतानाचा व्हायरल झालेला फोटो एडिटेड आहे.

Result: Altered Photo

Sources
X post by @BluntIndianGal, dated March 21, 2024
Facebook Post By ViratGang, Dated March 21, 2024

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular