Authors
ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडाही सोशल मीडियावरील अनेक फेक दाव्यांनी चर्चेत राहिला. बांगलादेशातील उठाव ते महाराष्ट्राच्या राजकारणापर्यंत अनेक दावे करण्यात आले. बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे 14 टन मांस सापडले, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक असा दावा करीत एक फोटो व्हायरल झाला. केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. असा दावा करण्यात आला. रमजानमध्ये सलग ३० दिवस इफ्तार देणाऱ्या इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे 14 टन मांस सापडले?
बेंगळुरूमध्ये कुत्र्याचे 14 टन मांस सापडले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली?
महाराष्ट्रात न्यायालयाबाहेर न्यायाधीशांनी वकिलाला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
हे शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक नाहीत
शेख हसिनांच्या बेडरूममध्ये झोपलेले आंदोलक असा दावा करीत एक फोटो व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
केंद्राने वक्फवर बंधने आणू नयेत असे उद्धव ठाकरेंनी म्हटले?
केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले?
रमजानमध्ये सलग ३० दिवस इफ्तार देणाऱ्या इस्कॉनचे स्वामी नीताई दास यांनाही बांगलादेशात ठार मारण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा