Authors
मागील आठवड्यात सोशल मीडियावर फेक दाव्यान्नी धुमाकूळ घातला. ओडिशा येथे झालेल्या दुर्दैवी रेल्वे अपघाताला जोडून खोटे दावे व्हायरल झाले. अपघाताच्या ठिकाणी काम करणारा शरीफ नावाचा स्टेशन मास्टर फरार झाला असा दावा करण्यात आला. रेल्वे रुळांवर दगड ठेवणाऱ्या मुलांचा व्हिडीओ शेयर करून मोठे कारस्थान शिजत असल्याचा दावा करण्यात आला. उत्तन येथे समुद्रकिनाऱ्याजवळ सुटकेस मध्ये सापडलेल्या महिलेचा मृतदेह लव्ह जिहाद चा प्रकार असल्याचा दावा करण्यात आला. स्वीडन देशाने सेक्स ला खेळ म्हणून मान्यता दिली आहे. असा एक दावा झाला. बीएस्सी नर्सिंग करणाऱ्या व्यक्ती आता एमबीबीएसशी समकक्ष ठरणार असा दावा झाला. कोईमतूर येथे जिहादी बिर्यानी करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
महिलेच्या मृतदेहाशी कम्युनल अँगल नाही
उत्तनच्या किनाऱ्यावर सुटकेसमध्ये सापडलेली महिला लव्ह जिहादची शिकार आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
स्वीडनने सेक्सला एक खेळ म्हणून घोषित केले?
स्वीडनने सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कोईमतूर मध्ये बिर्यानी जिहादची अफवाच
बिर्यानीत नपुसकत्वाचे औषध मिसळून जिहाद करणाऱ्यांना कोईमतूर पोलिसांनी पकडले असून बिर्यानी खाताना सावध राहा, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले.
ओडिशा ट्रेन अपघातानंतर स्टेशन मास्तर ‘शरीफ’ फरार?
ओडिशातील बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ तीन ट्रॅक रेल्वे अपघातानंतर स्टेशन मास्टर शरीफ फरार झाला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.
रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवण्यामागे षडयंत्र?
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रेल्वे ट्रॅकवर दगड टाकून मोठे षडयंत्र रचले जात आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
बीएससी नर्सिंग एमबीबीएसच्या समकक्ष?
बीएससी नर्सिंग एमबीबीएसच्या समतुल्य असेल आणि त्यांना कनिष्ठ डॉक्टर मानले जाईल, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in