Authors
पावसाचा रोज वाढत असताना त्याच प्रमाणात बनावट दाव्याचा पाऊसही सोशल मीडियावर जोरदार पडला. मागील आठवड्यात अनेक दावे करण्यात आले. मणिपूरात महिलांची विवस्त्र धिंड काढणारे आरएसएसशी संबंधित आहेत, असा दावा करण्यात आला. स्टार चिन्ह असलेल्या ₹५०० च्या नोटा बनावट असल्याचा दावा करण्यात आला. ठराविक दिवस न सांगता तुमचे मोबाईल आणि टॅब्लेट्स दूर ठेवा कारण पृथ्वीजवळून मध्यरात्री कॉस्मिक किरण जाणार आहेत. असा दावा करण्यात आला. मणिपूरमध्ये काँग्रेसच्या सांगण्यावरून नग्न महिलांचे पथक पोलिसांचा पाठलाग करून आंदोलन करत आहे. असा राजकीय दावा करण्यात आला. ढबू मिरचीत विषारी साप आढळत असल्याचा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
मणिपूर हिंसाचारात आरएसएस कार्यकर्ते दोषी?
मणिपूरमधील नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत दोन कुकी महिलांना विवस्त्र करून परेड करणाऱ्या पुरुषांच्या गटात आरएसएसचे दोन कार्यकर्ते होते असा दावा एक इमेज शेयर करून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
नंबर पॅनलमध्ये ‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा बनावट नाहीत
‘स्टार’ चिन्ह असलेल्या ₹500 च्या नोटा बनावट आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले.
नग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथींचा व्हिडिओ मणिपूरचा नाही
मणिपूरमध्ये काँग्रेसच्या सांगण्यावरून नग्न महिलांचे पथक पोलिसांचा पाठलाग करून आंदोलन करत आहे, असा दावा एक व्हिडीओ शेयर करून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
मध्यरात्री कॉस्मिक किरण पृथ्वीजवळून जाणार आहेत?
प्रत्येकाने आपले मोबाईल दूर किंवा बंद ठेवावे कारण मध्यरात्री कॉस्मिक (वैश्विक) किरण पृथ्वीच्या फार जवळ जाणार आहेत, असा दावा करण्यात आला. हा दावा आमच्या तपासात खोटा असल्याचे उघड झाले.
ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप?
हिरव्या किंवा ढबू मिरचीत जगातील सर्वात लहान विषारी साप आढळत असून काळजी घ्या. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in