Authors
जुलै महिन्यात पावसाची रिपरिप सुरु असतानाच सोशल मीडियावर बनावट दाव्यांची बरसात सुरूच राहिली. कॅरिपिल नावाचे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते, असा दावा करण्यात आला. विकिलिक्सने ब्रिटनच्या गुप्त बँकांमध्ये ठेवलेल्या मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या काळ्या पैशाची यादी जाहीर केली आहे, असा दावा करण्यात आला. अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चनने अनेक दशकांनंतर सलमान खानसोबत फ्रेम शेअर केली, असा दावा करण्यात आला. अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर तरुणीने पोलिसांसोबत गैरवर्तन केले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
हे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते?
कॅरिपिल नावाचे औषध अवघ्या 48 तासांत डेंग्यू बरा करू शकते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
भाजप नेत्यांच्या काळ्या पैशाची यादी विकिलिक्सने जाहीर केली आहे का?
विकिलिक्सने ब्रिटनच्या गुप्त बँकांमध्ये ठेवलेल्या मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या काळ्या पैशाची यादी जाहीर केली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
ऐश्वर्या राय बच्चनने सलमान खानसोबत फ्रेम शेअर केली नाही
अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चनने अनेक दशकांनंतर सलमान खानसोबत फ्रेम शेअर केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
त्या तरूणीने अंमली पदार्थाचे सेवन केले होते?
अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर तरुणीने पोलिसांसोबत गैरवर्तन केले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा